मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले

Ramdas Athwale on PM Narendra Modi : बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक, रामदास आठवले यांची टीका तर पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले...

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 11:36 AM

मुंबई : बिहारमधील पाटन्यामध्ये देशाच्या 15 विरोधी पक्षांची काल एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. सर्व पक्षांनी आगामी काळातील निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षातील या बैठकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही आठवले यांनी भाष्य केलंय.

नरेंद्र मोदी यांचं कौतुक

बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते जातील आणि आपली भूमिका नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडतील. नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्ट्रॉंग आहे 2024 या निवडणुका आम्ही जिंकू. विरोधकांना पराभूत करण्याची नीती आमच्याकडे आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणं सोपं नाही, असं आठवले म्हणालेत.

नीतीश कुमार यांच्यावर टीका

युतीचा भाग असणारी जेडीयू बाहेर पडली. नीतीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडले. त्यांनी आरजेडीसोबत जात सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये नीतीश कुमार हे मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडीवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आमच्यासोबत युतीत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देखील ते अनेक वर्ष भाजपसोबत होते. बिहारमध्ये त्यांच्या कमी जागा आल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांची भाषा बदलली आहे, असं आठवले म्हणाले.

इस्कॉनची भूमिका आहे ती मानव जातीमध्ये शांती निर्माण झाली पाहिजे. आज देशाभरामध्ये आणि जगभरामध्ये इस्कॉन चे 1000 मंदिरं आहेत. शांतीचा संदेश देणारी ही संस्था आहे. सर्वधर्मसमभावची त्यांची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे संविधान आहे. हे सर्व धर्माच्या लोकांना न्याय देणारं आहेत. एकमेकांच्या धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आपली जबाबदारी आहे. शांतीच्या संदेश देत देत हे रथ यात्रा इथून निघणार आहे, असं आठवले म्हणाले.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.