क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Sanjay Shirsat on Sushma Andhare Case : सुषमा अंधारे यांचे आरोप अन् छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिलेली क्लीन चिट; संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले तो व्हीडिओ...

क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 1:51 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांना पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संजय शिरसाट यांना क्लीन चिट दिली आहे. ही क्लीन चिट मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मी कुणाचंही नाव घेतलं नाही. तुम्ही कुटाने केले. काही लोकांना प्रसिद्धी हवी असते. त्यानुसार ते वागतात. त्या व्हीडिओत अश्लील काय बोललो ते सांगा. जर कुठे त्या व्हीडिओत अश्लील दिसलं असतं तर मी राजकारण सोडलं असतं, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. लढाई लढावी लागते. केलेल्या आरोपांसाठी लढेन. मी बेबाक बोलतो, सडेतोड बोलतो. पण हा माणूस जे बोलला ते सत्य बोलतो, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले?

मंत्रिमंडळ विस्तारावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. पण कधी होणार याचं नेमकं उत्तर मी देऊ शकत नाही. अधिवेशनापूर्वी कॅबिनेट विस्तार होईल, असं वाटतं. मी माझ्या कामात व्यस्त आहे, दे तो भला, ना दे तो भी भला, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

विनायक राऊत यांच्या बोलण्याला बेस काय आहे? हे फक्त वावड्या ऊठवतात. त्यांच्या नाही ठाकरे गटाचे लोक आमच्या संपर्कात आहेत. संजय राऊत आणि कंपनीची कार्यपद्धती पाहा. संजय राऊत पक्ष प्रमुखाच्या अविर्भावात आहेत, असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत. सगळी हवा निघणार आहे. खोल समुद्रातील गेल्यावर जशी अवस्था होते, तशी अवस्था संजय राऊत यांची होईल. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय. कुत्र्या-मांजराची भाषा ही सामना संपादकाला शोभणारी आहे का? संजय राऊत आमच्या कृपेने खासदार झालेत. त्यांची लायकी काय आहे. आम्ही माणसं फोडली पण संजय राऊत यांनी ढेकुण तरी मारलाय का? संजय राऊत यांच्यात राजकिय परिपक्वता आहे का ? त्यांचा राजकीय कार्यकाळ आता संपलाय, असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र डागलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.