मुंबईकर ऑफिसला कसे जाणार? अनलॉक नियमावलीवरुन काँग्रेस नेत्याचाच सरकारला प्रश्न

मुंबई लोकलसह सार्वजनिक वाहतूक अगदी मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आलीय. त्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

मुंबईकर ऑफिसला कसे जाणार? अनलॉक नियमावलीवरुन काँग्रेस नेत्याचाच सरकारला प्रश्न
काँग्रेस नेते संजय निरुपम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 3:10 PM

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चित्र पाहायला मिळत आहे. त्यानुसार राज्यात 5 टप्पे पाडण्यात आले असून, त्यानुसार अनलॉकिंगची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. मुंबईतही काही प्रमाणात नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे. राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची 5 स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे, त्यात मुंबई तिसऱ्या स्तरात येत असल्याच महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दुकाने, ऑफिस आदींना वेळेची मर्यादा घालून देत, ती सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई लोकलसह सार्वजनिक वाहतूक अगदी मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आलीय. त्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय. (Sanjay Nirupam questions Thackeray government about public transport)

संजय निरुपम यांनी ट्विटरद्वारे ठाकरे सरकारला प्रश्न विचारलाय. ‘मुंबईत लॉकडाऊन काही प्रमाणात हटवण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे मुंबईकरांना अजून काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कार्यालये सुरु होत आहेत, पण सार्वजनिक वाहतूक बंद आहे. बसेसची संख्या वाढवली जावी किंवा लोकल वाहतूक मर्यादित स्वरुपात सुरु करण्यात यावी. नाहीतर लोक कार्यालयांमध्ये कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसची एक मर्यादा आहे’, अशा शब्दात निरुपम यांनी ठाकरे सरकारला अनलॉकिंच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आहे.

लॉकडाऊन उठताच मुंबईत ट्रॅफिक जॅम

अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईत सोमवारी लॉकडाऊन उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

शहरातील निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. आज सकाळपासूनच लोकांनी कामासाठी घराबाहेर पडायला सुरवात केली आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या ट्रॅफिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनलॉक मुळे आता आंतरजिल्हा बंदी असली तरी ई-पास गरजेचा आहे. सध्या मुंबईला जाण्यासाठी मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर मोठ्याप्रमाणावर गाड्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Unlock | सोमवारपासून निर्बंध उठणार, आदेश जारी, कोणत्या टप्यात, कोणते जिल्हे अनलॉक? वाचा सविस्तर

‘आशा’ सेविका लढवय्या, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात तुमची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री

Sanjay Nirupam questions Thackeray government about public transport

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.