वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, परभणीत महाविकास आघाडीला धक्का ?

सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात नेहमीच विविध अठरा पगड जाती धर्माच्या उमेदवारांना संधी दिलेली आहे. आता विधानसभेसाठी दुसर्‍या यादीत वंचितने मुस्लीम उमेदवारांना संधी दिलेली आहे. परभणीत महाविकास आघाडीला धक्का देणारा मोठा उमेदवार वंचितने दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, परभणीत महाविकास आघाडीला धक्का ?
Prakash-Ambedkar
Follow us
| Updated on: Oct 09, 2024 | 2:21 PM

एकीकडे महाराष्ट्रातील विधान सभा निवडणूकीच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती आहे. दुसरीकडे राज्यातील वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवाराची दुसरी यादी जाहीर करुन आघाडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामील न होता स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूकांच्या वेळी देखील महाविकास आघाडीत सामील होणार की नाही असा सस्पेन्स कायम ठेवत वंचितने स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्या होत्या. आताही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी फारकत घेत स्वतंत्रपणे विधान सभा निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणीत मोठा मासा गळाला

परभणीत काँग्रेसचा मोठा मुस्लीम नेता वंचितच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे माजी उप महापौर आणि विद्यमान महापालिकेचे सभागृह नेते सय्यद समी सय्यद साहेबजान (माजु लाला) यांना वंचितकडून परभणी विधानसभेसाठी उमेदवारी घोषीत केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दहा मुस्लिम उमेदवारांच्या यादीत सय्यद समी यांच्या नावाचा समावेश आहे. सय्यद समी परभणी काँग्रेसचे दिग्गज नेते असून 2014 विधानसभा निवडणुकीत सय्यद सामी यांचे भाऊ सय्यद खालेद यांनी विधानसभा निवडणूक लढवत 45 हजार मतदान घेत दुसरा क्रमांक गाठला होता. त्यामुळे सय्यद समी यांच्या उमेदवारीने परभणीत महाविकास आघाडीला वंचितने मोठा हादरा दिल्याचे मानले जात आहे.

येथे पोस्ट पाहा –

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे.

मलकापूर विधानसभा मतदार संघ क्रमांक 21 मधून शाहेजाद खान सलीम खान,

बालापूर 29 मधून खतीब सईद नतीकुद्दीन,

परभणी 96 मधून सईद सामी सईद साहेबजान,

औरंगाबाद सेंट्रल 107 मधून मोहम्मद जावीद मोहम्मद इश्क,

गंगापूर 111 मधून सयैद गुलाम नबी सयैद,

कल्याण पश्चिम 138 मधून अयाझ गुलजार मौलवी,

हडपसर 213 मधून एड.मोहम्मद अफ्रोज मुल्ला,

माण 258 मधून इम्तियाज जफर नडाफ,

शिरोळ 280 मधून आरिफ मोहम्मद अली पटेल,

सांगली 282 मधून आल्लाउद्दीन हयातचॉंद काजी.

पहिल्या यादीतील उमेदवार

वंचित बहुजन आघाडीचे पहिल्या यादीत खालील प्रमाणे उमेदवार देण्यात आले होते. रावेर – शमिभा पाटील,शिंदखेड राजा – सविता मुंढे, वाशिम – मेघा किरण डोंगरे, धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे, साकोली – डॉ. अविनाश नान्हे, नांदेड दक्षिण- फारुख अहमद, लोहा – शिवा नारांगले, औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव – किसन चव्हाण, खानापूर – संग्राम कृष्णा माने

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.