अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवार भाजप नेत्यांवर कायदेशीर कारवाईच्या तयारीत, म्हटले…
NCP Ajit Pawar: मी एनडीएमध्ये आहे. त्याचा अर्थ हा नाही की मी त्यांच्या विचारांचे समर्थन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेते नाही तर ते देशाचे पंतप्रधान आहे. मी अजित पवार यांच्या पक्षात कोणत्याही भीतीमुळे गेलो नाही.
महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहे. भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तसेच महायुतीमध्ये इतर छोटे पक्ष आहे. हे सर्व पक्ष विधानसभा निवडणूक एकत्र लढवत आहेत. परंतु या पक्षांमधील वाद समोर येऊ लागला आहे. भाजपच्या प्रचंड विरोधानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले. तसेच त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट दिले. भाजपकडून नवाब मलिक यांना सातत्याने लक्ष केले जात आहे. नवाब मलिक यांचे कनेक्शन दाऊद इब्राहिमसोबत असल्याचा आरोप भाजप नेते लावत आहे. त्यावरुन आता नवाब मलिक आक्रमक झाले आहे. त्यांनी आपल्यावर आरोप लावणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले नवाब मलिक
नवाब मलिक यांनी सांगितले की, जी लोक आपला उल्लेख दाऊद इब्राहिमसोबत करत आहे, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. माझ्यावर मनी लॅन्ड्रींगसोबत दाऊद कनेक्शन आणि दहशतवादी कनेक्शनचे खोटे आरोप लावत आहे. या आरोपांमुळे माझी प्रतिमा खराब होत आहे. आरोप करणाऱ्यांनी माझी माफी मागितली नाही तर मला कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे.
भाजपबाबत नवाब मलिक काय म्हणाले?
भाजपसोबत आपली भूमिका आधीसारखीच असणार आहे. त्यात काहीच बदल होणार नाही. योगी आदित्यनाथ यांच्या “बटेंगे तो कटेंगे” घोषणेचे आपण समर्थन करणार नाही. अजित पवार यांच्यासोबत तुम्ही का उभे आहात? या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले, मी जेव्हा कारागृहात होतो, तेव्हा अजित पवार यांनी माझ्या परिवारास खूप मदत केली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आहे. ते माझे नेते आहे. त्यांच्याशिवाय महायुतीमधील कोणालाही आपण नेते म्हणून स्वीकारत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भात नवाब मलिक म्हणाले, मी एनडीएमध्ये आहे. त्याचा अर्थ हा नाही की मी त्यांच्या विचारांचे समर्थन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेते नाही तर ते देशाचे पंतप्रधान आहे. मी अजित पवार यांच्या पक्षात कोणत्याही भीतीमुळे गेलो नाही. नवाब मलिक कोणाला घाबरत नाही. आरोप होत राहतात. परंतु मी तडजोड करणार नाही.