Nagar Panchayat Election : नगर पंचायत निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Dec 21, 2021 | 10:13 PM

106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक‍ निवडणुकीसाठी आज सरासरी 76 टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के मतदान झाले. तसेच महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 38 टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले.

Nagar Panchayat Election : नगर पंचायत निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या एका क्लिकवर
निवडणूक मतदान
Follow us on

मुंबई : प्राथमिक अंदाजानुसार 106 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक‍ निवडणुकीसाठी (Nagar Panchayat Election) आज सरासरी 76 टक्के आणि भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद (Zilla Parishad) व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकीसाठी 69 टक्के मतदान झाले. तसेच महानगरपालिकांच्या तीन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 38 टक्के आणि ग्रांमपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 73 टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या अनारक्षित केलेल्या जागा वगळून उर्वरित सर्व जागांसाठी आज हे मतदान झाले.

जिल्हा निहाय नगर पंचायत निवणुकीतील मतदानाची टक्केवारी

अहमदनगर जिल्हा – एकूण मतदान 82.17 टक्के

  • अकोले – 80.69 टक्के
  • कर्जत – 80.20 टक्के
  • पारनेर – 86.09 क्के

नाशिक जिल्हा – एकूण 76.48 टक्के

  • पेठ- 80.63 टक्के
  • सुरगाणा-75.50 टक्के
  • कळवण-74.15 टक्के
  • देवळा-78.34 टक्के
  • निफाड-73.64 टक्के
  • दिंडोरी-79.90 टक्के

नागपूर जिल्हा – एकूण 75.51 टक्के

  • कुही – 77.9 टक्के
  • हिंगणा – 73.6 टक्के

सातारा जिल्हा – एकूण 75.27 टक्के

  • लोणंद- 72.17 टक्के
  • कोरेगाव-73.56 टक्के
  • पाटण- 73.55 टक्के
  • वडूज-75.11 टक्के
  • खंडाळा-85.35 टक्के
  • दहिवडी-79.27 टक्के

बुलडाणा जिल्हा

  • मातोळा – 79.63 टक्के
  • संग्रामपूर – 83.60 टक्के

>> चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 6 नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं. या सहा नगर पंचायतींसाठी मिळून एकूण 76.20 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

>> नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायतीसाठी एकूण 80.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

>> गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 9 नगर पंचायतींसाठी 75.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

>> भंडारा जिल्ह्यातील लाखणी, मोहाडी आणि लाखंदूर नगर पंचायतींसाठी 72 टक्के मतदानाची नोंद झाली.

>> अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीसाठी 70.70 टक्के, तर भातकुली नगर पंचायतींसाठी 81.61 टक्के मतदान झाले.

यवतमाळ जिल्हा – 6 नगरपंचायतीसाठी 80 टक्के मतदान

  • बाभूळगाव – 81.76 टक्के
  • महागाव – 80.64 टक्के
  • मारेगाव – 80.98 टक्के
  • झरी – 88.32 टक्के
  • कळंब – 76.19 टक्के
  • राळेगाव -73.79 टक्के

वर्धा जिल्हा – एकूण 76.46 टक्के मतदान

  • कारंजा – 78.16 टक्के
  • आष्टी – 72.09 टक्के
  • सेलू – 74.54 टक्के
  • समुद्रपूर – 82 टक्के

सिंधुदुर्ग जिल्हा – एकूण 75 टक्के मतदान

  • वैभववाडी – 81.86 टक्के
  • दोडामार्ग – 81.86 टक्के
  • कुडाळ – 72 टक्के
  • देवगड – 70.91 टक्के

सोलापूर जिल्हा

  • नातेपुते – 76 टक्के
  • माढा – 77 टक्के
  • माळशिरस 79 टक्के
  • महाळुंग-श्रीपूर – 73 टक्के

इतर बातम्या :

उद्धव ठाकरे चहापानाला गैरहजर, चंद्रकांत पाटील म्हणतात, आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या

मुख्यमंत्र्यांविना पार पडलं सत्ताधाऱ्याचं चहापान, विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशात वातावरण तापणार!