मुंबई : राज्यातील एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका (Nagar Panchayat Election) जाहीर झाल्या होत्या. त्यातील पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, यवतमाळ- झरी- जाणणी, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (OBC Reservation) राखीव नव्हती. त्यामुळे तेथील सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे.
>> ठाणे- मुरबाड व शहापूर
>> रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)
>> रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे
>> पुणे- देहू (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी
>> सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ
>> सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)
>> नाशिक- निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी धुळे- साक्री
>> अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर
>> जळगाव- बोदवड
>> औरंगाबाद- सोयगाव
>> जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)
>> परभणी- पालम
>> बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी
>> लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ
>> उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.
>> नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर
>> हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ
>> अमरावती- भातकुली, तिवसा
>> बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा
>> यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव
>> वाशीम- मानोरा, नागपूर- हिंगणा, कुही
>> वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर
>> भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर
>> गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी
>> चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही
>> गडचिरोली- अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा
भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10; तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठी उद्या मतदान होत आहे.
विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान होईल.
सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होईल.
इतर बातम्या :