NMC Election 2022 (Ward 11) | प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपाचे वर्चस्व, इतर पक्षांना विजयासाठी करावी लागणार जोरदार तयारी
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 11 ची निवडणूक दरवेळी चर्चेच असते. यंदाही प्रभागात निवडणूकीच्या अगोरदरच आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. प्रभाग 11 मध्ये खेरीपुरा, लालगंज, प्रेमनगर, बस्तरवारी, पेंडलवाडी, दहीबाजार, इतवारी रेल्वे स्टेशन, शांतीनगर कॉलनी, गोडपूरा ही भाग प्रमुख येतो.
नागपूर : नागपूर (Nagpur) महापालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागलेयं. यंदाच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी देखील केलीयं. नागपूर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामध्येही राज्यात एकनाथ शिंदे गटासोबत भाजपाने सत्तास्थापन केल्याने ही निवडणूक (Election) अधिकच श्रेयवादीची देखील ठरण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे दोन नेते केंद्रात आणि राज्यात महत्वाच्या पदावर आहेत आणि नागपूर त्यांचा बालेकिल्ला असल्याने भाजपाची सत्ता कायम ठेवण्यासाठी चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. निवडणूका जाहिर झाल्यापासून अपक्ष देखील कामाला लागले आहेत. आरक्षणामुळे (Reservation) अनेकांचे गणित देखील बिघडल्याचे चित्र अनेक प्रभागांमध्ये बघायला मिळते आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
राष्ट्रवादी | ||||
अपक्ष |
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 11 ची निवडणूक चर्चेत
नागपूरच्या प्रभाग क्रमांक 11 ची निवडणूक दरवेळी चर्चेच असते. यंदाही प्रभागात निवडणूकीच्या अगोरदरच आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. प्रभाग 11 मध्ये खेरीपुरा, लालगंज, प्रेमनगर, बस्तरवारी, पेंडलवाडी, दहीबाजार, इतवारी रेल्वे स्टेशन, शांतीनगर कॉलनी, गोडपूरा ही भाग प्रमुख येतो. उत्तरेला खैरीपूरा शीतला माता मंदीर जवळील मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील खैरीपूरा नाला अंडरब्रीजपासून पूर्वकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गाने बिनाकी खैरीपूरा रेल्वे क्रॉसिंगपर्यंत व पुढे त्याच रेल्वे मार्गाने मुंबई-हावड़ा रेल्वे मार्गाजवळील श्री. पुरणचंद गुरव यांच्या घरापर्यंत आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
प्रभाग कुठून कुठंपर्यंत जाणून घ्या सविस्तरपणे
दक्षिणेला वासुदेवराव घारपेंडे यांच्या घराजवळील छिदवाडा व नागभीड रेल्वे मार्गाच्या संगमापासून पश्चिमेकडे |जाणाऱ्या इतवारी रेल्वे स्टेशन मार्गाने नंतर पुढे दक्षिणेकडील मालधक्का रोडपर्यंत नंतर पुढे पश्चिमेकडे मालधक्का रस्त्याने मारवाडी चौकापर्यंत नंतर पुढे उत्तरेकडे जाणान्या रस्त्याने इतवारी रेल्वे मार्गावरील दहीबाजार पुलापर्यंत. इतवारी रेल्वे मार्गावरील मस्कासाथ रेल्वे पुलापासुन ईशान्य दिशेकडे जाणाऱ्या मेहंदीबाग रस्त्याने राऊत चौकापर्यंत व पुढे त्याच रस्त्याने चखणा चौकापर्यंत प्रभाग आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
वाचा प्रभाग 11 मधील नगरसेवकांची नावे
प्रभाग क्रमांक अकरामध्ये 2017 ला भाजपाचेच वर्चस्व बघायला मिळाले. प्रभाग 11 मधील चारही निवडून आलेले उमेदवार हे भाजपाचेच होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 11 गट अ मधून संदीप जाधव भाजपा, प्रभाग क्रमांक 11 गट ब संगीता गिर्हे भाजपा, प्रभाग क्रमांक 11 गट क अर्चना पाठक भाजपा, प्रभाग क्रमांक 11 गट ड भूषण शिंगणे भाजपा. हे चारही जण मोठ्या मताधिक्याने 2017 मध्ये निवडून आले होते. यंदा प्रभाग क्रमांक 11 मधून निवडून येण्यासाठी भाजपासोडून इतर पक्षांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.