मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट, पटोले म्हणतात, बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? वाचा ओबीसी परिषदेवर स्पेशल रिपोर्ट

मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट आहे. ओबीसींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी गोंधळ घातला. तेव्हा 2001-02 मध्ये दहावीच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरु झाली. विधानसभेचा अध्यक्ष असतानाही मोर्चे काढले. जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर उतरलो.

मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट, पटोले म्हणतात, बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? वाचा ओबीसी परिषदेवर स्पेशल रिपोर्ट
नाना पटोले, ओबीसी चिंतन बैठक
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 7:11 PM

नागपूर : लोणावळ्यातल्या ओबीसी व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबीरात नाना पटोलेंची हजेरी विशेष होती. एरवी ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून जास्त दिसतात पण आज त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यांना हात घालत, गरज पडली तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात केंद्राकडे जाऊ असं म्हणाले. विशेष म्हणजे ओबीसींची जनगणना राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी आणि केंद्र हवी ती आकडेवारी देत नाही, असा आरोपही यावेळेस नाना पटोले यांनी केला. (Nana Patole’s Statement at the OBC Chintan meeting on the issue of OBC reservation)

मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट!

नाना पटोले हे काँग्रेसचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाकडून खासदार झाले तर त्यांनी मोदींचा विरोध करत पक्ष सोडला. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. आताही महाविकास आघाडीत त्यांच्या आक्रमकपणामुळे अनेकदा अस्वस्थता पसरते. पण त्यांचा आक्रमकपणाच काँग्रेसला चांगले दिवस आणून देईल असं जाणकारांना वाटतं. ओबीसीच्या चिंतन शिबिरातही पटोलेंनी स्वत:च्या आक्रमकतेची कबुली दिली. ते म्हणाले- पद एकाला तर त्याचे अधिकार दुसऱ्याकडे असतात, हे आपण बऱ्याचदा बघितलं. आपल्याला संविधानीक पदं मिळाली, पण ती जाण्याच्या भीतीनं लोक भूमिका मांडत नाहीत. इतिहास लपवला जातो पण वास्तविकता मांडण्याची हीच वेळ आहे. मी लहान होतो, तेव्हा कपड्याला पैसे नसायचे, तेव्हाच एससी, एसटीच्या मुलांना नविन कपडे मिळायचे, पुस्तकं मिळायची. ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी आमदार झाल्यावर प्रयत्न केले. मी गोंधळ घालण्यात एक्सपर्ट आहे. ओबीसींच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून मी गोंधळ घातला. तेव्हा 2001-02 मध्ये दहावीच्या मुलांना शिष्यवृत्ती सुरु झाली. विधानसभेचा अध्यक्ष असतानाही मोर्चे काढले. जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा रस्त्यावर उतरलो.

बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का?

नाना पटोले यावेळेस म्हणाले की, ओबीसींची जनगणना राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी. नेमकी आकडेवारी किती हे केंद्र देत नाही. आता आयोग म्हणते कोरोना आहे, इम्पेरीकल डाटा गोळा कसा करायचा. इम्पेरीकल डाटा गोळा केंद्राने करावं की राज्याने करावं हा राजकीय मुद्दा आहे असही पटोले म्हणाले. मोदींवर टीका करताना काही लोकं संविधानापेक्षा स्वत:ला मोठं समजतात, त्याचे फळं आपल्याला भोगावे लागतात असही म्हणाले. आपण एकत्र राहिले तर कुणीच बिघडवू शकत नाही. आज एससी, एसटीचं आरक्षण काढलं तर ते सरकार विरोधात रस्त्यावर उतरतात, आपल्या बारा बलुतेदारांमध्ये ती ताकद नाही का? असा सवालही यावेळेस पटोलेंनी उपस्थित केला.

संबंधित बातम्या :

‘सारथीला मिळतील तेवढेच पैसे महाज्योतीला मिळणार, मी बसलोय इथे’, मंत्री विजय वडेट्टीवारांचा विश्वास

इम्पेरिकल डाटा हा राज्य सरकारचाच विषय, ओबीसी चिंतन बैठकीत पंकजा मुंडेंचा पुनरुच्चार

Nana Patole’s statement at the OBC Chintan meeting on the issue of OBC reservation

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.