मुंबई: राज्यात सत्ता येताच भाजपने (bjp) फोनवरून हॅलो म्हणणं सक्तीचं केलं आहे. त्याला रझा अकादमीने विरोध केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही विरोध करून राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना घेरलं आहे. हा वाद सुरू असतानाच आता त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उडी घेतली आहे. नाना पटोले यांनी भाजपच्या वंदे मातरमला जय बळीराजा हा पर्याय दिला आहे. आजपासून रोज कुणाशीही बोलताना जय बळीराजा म्हणा, असे फर्मानच नाना पटोले (nana patole) यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं बजावलं आहे. राष्ट्रगीत वंदे मातरम हा आमचा स्वाभिमान आहे. मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना व जनतेशी संवाद साधतांना ‘जय बळीराजा‘ म्हणावे, असे निर्देश दिल्यांच पटोले यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेची सुरुवात करतानाच त्यांनी जय बळीराजा म्हणत सुरुवात केली. आपला अन्नदाता सुरक्षित राहीला नाही. जीडीपी खाली गेला आहे. बळीराजा सुरक्षित राहावा, सर्वांच्या लक्षात राहावा म्हणून आम्ही जय बळीराजा असं बोलण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रगीत सर्वांना परिचित आहे. त्यावर काही बोलायाच नाही. मात्र शेतकरी आमचा कणा आहे. तो सर्वांच्या लक्षात रहावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
वंदे मातरम् बद्दल आम्हाला आक्षेप असण्याचे कारण नाही. आम्हाला त्याचा अभिमानच आहे पण त्यासाठी कोणावर जबरदस्ती करता येणार नाही. शेतकरी आपल्या देशाच्या कणा आहे त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्वाचे विषय दुसरीकडे वळवण्यासाठी धर्माच्या आधारावर काही मुद्दे पुढे केले जात असतील तर ते बरोबर नाही. आपल्या देशाचा अन्नदाता असुरक्षित व दुर्लक्षित आहे, जीडीपी शेतीवरच आधारीत आहे. जीडीपी ऐवजी डीपी बदल्यास सांगितले जाते. म्हणूनच आम्ही बोलताना सर्वांनी बळीराजाची आठवण रहावी म्हणून जय बळीराजा बोलावे अशी भूमिका घेतली आहे, असंही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे पण अजून पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, हेक्टरी 75 हजार रुपये द्यावेत ही आमची मागणी आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरू व शेतकऱ्याला भरीव तसेच तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू. काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील सरकार हे मात्र शेतकरी विरोधी आहे, अशी टीका त्यांनी केली.
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्यावरून देशाला संबोधीत केले पण महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, देशातील ज्वलंत प्रश्न यावर ते एक शब्दही बोलले नाहीत. पंतप्रधान महागाईमधील ‘म’ सुद्धा बोलले नाहीत. पंतप्रधान दीड तास तेच तेच बोलत होते पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची दखलही घेतली नाही हे दुर्दैवी आहे, असा हल्लाही त्यांनी च