चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा सवाल

कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करण्याचं सोडून भाजप नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. (nana patole attacks chandrakant patil over vaccine price hike by serum)

चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा सवाल
nana patole
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 7:24 PM

मुंबई: कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करण्याचं सोडून भाजप नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि त्यांचा पक्ष कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ देऊन मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी भानावर यावे आणि ते पुण्याचे सेवक आहेत की पुनावालाचे याचे उत्तर द्यावे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (nana patole attacks chandrakant patil over vaccine price hike by serum)

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपचा खरपूस समाचार घेतला. केंद्र सरकारकडून पुरेशी मदत मिळत नसतानाही महाराष्ट्र कोरोनाविरोधातील लढाई पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. देशातील भाजप शासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र कोरोनाचा अत्यंत चांगल्या पद्धतीने मुकाबला करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारला वारंवार कोरोनाच्या संभाव्य धोक्याबाबत सावध करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सकारात्मक सूचना केल्या. पण त्यावर अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्रातील मंत्री व भाजप नेते त्यांची खिल्ली उडवण्यात धन्यता मानत होते. काँग्रेस नेत्यांचे सल्ले वेळीच ऐकले असते तर आज देशाचे स्मशान झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशी नक्कीच झाली नसती, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या?

18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची आग्रही मागणी काँग्रेसनेच केंद्राकडे केली होती. केंद्र सरकारने ती मान्य करताना चलाखी करत लस पुरवठ्याची आपली जबाबदारी झटकून ती राज्य सरकारांवर ढकलली. केंद्राच्या या घोषणेनंतर लस उत्पादक कंपनी सीरमने लसीचे नवीन दर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. याप्रमाणे, पूर्वी खासगी रुग्णालयांना 250 रूपयांना मिळणारी लस आता 600 रुपयांना मिळणार आहे. केंद्र सरकारला पूर्वीच्याच किंमतीत म्हणजे 150 रुपयांना ही लस मिळणार आहे. तर राज्य सरकाराला यासाठी 400 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. एकाच लसीच्या अशा तीन वेगवेगळ्या दरांना मान्यता देऊन केंद्र सरकार नफेखोरीला प्रोत्साहन देत आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी आवाज उठलला तर चंद्रकांत पाटलांना मिरच्या का झोंबल्या? चंद्रकांत पाटलांनी भान ठेवून बोलावे. भाडोत्री ट्रोलप्रमाणे खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेस नेत्यांबद्दल अपशब्द काढले तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप सत्तेसाठी हपापली

संकट काळातही भाजपचे नेते मृतदेहावर उभे राहून आपल्याला पुन्हा सत्ता मिळवण्याचा काही मार्ग सापडतोय का? याच्या शोधात आहेत. चंद्रकांत पाटील यांनी तर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांच्यावर टीका करत केंद्र सरकारचा गलथानपणा आणि अपयशावर पांघरून घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील अनेक उच्च न्यायालयांनी आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोरोना संकटाळातील केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले आहे. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा, औषधी, ऑक्सिजन पुरवठा, रेमेडीसिवीर इंजेक्शन, व्हेंटिलेटर यांच्या वाटपावर नियंत्रण ठेवून संकटकाळात व्यापार सुरु केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राज्यातील भाजप नेत्यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण मुंबई पोलिसांनी तो उधळून लावला, असा दावाही त्यांनी केला आहे. (nana patole attacks chandrakant patil over vaccine price hike by serum)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांचा दुसऱ्या लाटेचा अंदाज अचूक ठरला, पण तयारी काय केली सांगा?; भाजपचा सवाल

भाजपा का बाबा बंगाली!, चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, जटिल समस्याका थाली बजाके इलाज; राष्ट्रवादीने डिवचले

पुण्यातून राज्य चालवा अथवा नवा पालकमंत्री द्या; चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना पुन्हा डिवचले

(nana patole attacks chandrakant patil over vaccine price hike by serum)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.