संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले...
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 10:04 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात बैठक झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याविषयी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात असं वक्तव्य करत या बैठकीचं गूढ जास्तच वाढवलं. त्यानंतर या बैठकीबाबत काँग्रेसने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आम्ही या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहत नाही असं म्हणत भाजपचे नेते भविष्यवाले आहेत असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे. (Nana Patole comment on Sanjay Raut Ashish Shelar secret meeting said we do not consider it as political meeting)

याला राजकीय भेट गृहीत धरत नाही

“महाराष्ट्र हे असे राज्य आहे जिथे कोणी कोणालाही भेटू शकतं. या सर्व नेत्यांनी एकमेकांसोबत काम केलेले आहे. ते एकमेकांना कधीही भेटू शकतात. त्यांची मैत्रीसुद्धा आहे. म्हणून आम्ही त्या भेटीला राजकीय भेट असं गृहीत धरत नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपचे नेते भविष्यवाले आहेत. मी भविष्यवाला नाही, असं म्हणत भाजपच्या नेत्यांवर प्रहार केले.

सर्वांची कोरोना चाचणी झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदावर निर्णय

विधानसभेच्या अध्यक्षपदावरुनही मागील काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. तर ठाकरे यांनीसुद्धा कोश्यारी यांच्या या पत्राला पत्राद्वारेच उत्तर दिले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आले. यावर भाष्य करताना त्यांनी येत्या सोमवारपासून आधिवेशन सुरु होणार आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड लवकर व्हावी असे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला वाटते. उद्या सर्वांची कोरोना चाचणी होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. अध्यक्षपदासाठी सर्व आमदारांमध्ये चर्चा केली जाईल. त्यानंतर हे नाव पुन्हा हायकमांडकडे पाठवले जाईल. आमच्या पक्षात लोकशाही आहे. भाजपसारखी ठोकशाही नाही, असे पटोले यांनी सांगितले

… तर भाजप विचार करेल

दरम्यान, आशिष शेलार-संजय राऊत यांच्यात झालेल्या बैठकीबद्दल बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. “भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल” असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

“… तर भाजप विचार करेल” संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

30 साखर कारखान्यांवर ईडीची कारवाई करा; चंद्रकांत पाटलांनी शहांना लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचाही उल्लेख

राफेल घोटाळ्याच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते? नाना पटोले यांचा सवाल

(Nana Patole comment on Sanjay Raut Ashish Shelar secret meeting said we do not consider it as political meeting)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.