प्रणिती शिंदेंची विनंती, नाना पटोलेंचा मोठेपणा, सोलापूरची चिमुकली उपचारासाठी हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं मोठेपण आज समोर आलं. नाना पटोलेंनी मुंबईला (Mumbai) ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या लहान मुलीसाठी स्वतःचे हेलिकॉप्टर दिले.

प्रणिती शिंदेंची विनंती, नाना पटोलेंचा मोठेपणा, सोलापूरची चिमुकली उपचारासाठी हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना
प्रणिती शिंदे नाना पटोलेImage Credit source: Tv9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 7:59 PM

सोलापूर : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचं मोठेपण आज समोर आलं. नाना पटोलेंनी मुंबईला (Mumbai) ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या लहान मुलीसाठी स्वतःचे हेलिकॉप्टर दिले. सोलापुरातील (Solapur) उंजल तुकाराम दासी या 4 वर्षीय मुलीला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला जायचे होते. नाना पटोले हेलिकॉप्टरने सोलापूरला आले होते मात्र त्यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर संबंधित मुलीच्या कुटुंबाला मुंबईला जाण्यासाठी दिले. नाना पटोले हेलिकॉप्टर ऐवजी रेल्वेने मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. उंजल तुकाराम दासी या लहान मुलीच्या हृदय विकाराच्या उपचाराकरीता मुंबई येथे जाण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्या विनंतीवरून नाना पटोले यांनी स्वत: चं हेलिकॉप्टर संबंधित मुलगी आणि तिच्या आई वडिलांना मुंबईला जाण्यासाठी दिलं.

प्रणिती शिंदे यांची विनंती नाना पटोले यांच्याकडून मान्य

सोलापूरमधील तुकाराम दासी, रा. सुनिल नगर, एम. आय. डी. सी. यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून त्यांची लहान मुलगी उंजल तुकाराम दासी हिला हृदय विकाराच्या आजार असल्याची माहिती दिली. मुलीवर तात्काळ शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असून त्याची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार प्रणिती शिंदे यांनी नाना पटोले यांना उंजल दासी याला उपचारासाठी पाठविण्याकरीता स्वतःचं हेलिकॉप्टर देण्याची विनंती केली. त्यानुसार नाना पटोले यांनी स्वतःच्या हेलिकॉप्टपने उंजल तुकाराम दासी हिला मुंबई येथे हृदय विकाराच्या उपचाराकरीता पाठविले व स्वतः रेल्वेले मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

नाना भाऊ तुमचे मनापासून आभार : प्रणिती शिंदे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी या विषयी काँग्रेसच्या मेळाव्यात माहिती दिली. नाना भाऊंनी त्यांचा दौरा रद्द केला. सोलापूरमध्ये एका मुलीचे नातेवाईक माझ्याकडे आले होते. त्यांना मुलीचं ह्रदयाचं ऑपरेशन करण्यासाठी मुंबईला जायचं होतं. नाना पटोले यांना हे समजल्यावर त्यांनी त्यांचं हेलिकॉप्टर त्या मुलीला मुंबईला जाण्यासाठी दिलं आणि आता ते सिद्धेश्वर एक्स्प्रेसनं मुंबईला जातील. ती मुलगी बरी होऊन सोलापूरमध्ये परत येऊदेत आणि नानाभाऊंना आशीर्वाद मिळू देत, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.

प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद देण्याची मागणी

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसमोर आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद देण्याची करण्यात आली आहे. महापालिकेचे कॉंग्रेसचे गटनेते आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी मंचावरुन जाहीर मागणी केली. सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस टिकवायची असेल तर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद द्या, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या लोकांना ओढत आहेत जर ताईला मंत्रीपद दिले तर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना अडवता येईल, अशी आर्त साद चेतन नरोटे यांनी नाना पटोलेंना घातली.

इतर बातम्या:

CWC Meeting : ‘देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू’, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?

आधार-पॅन कार्ड लिंक करा, अन्यथा 10,000 रुपयांचा दंड, पाहा SMS द्वारे Aadhaar-Pan लिंक करण्याची सोपी पद्धत

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.