VIDEO: फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील; नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. (nana patole)
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी झोटिंग समितीच्या अहवालावर प्रतिक्रिया करताना मोठं विधान केलं आहे. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचंही राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला, असं सांगतानाच तत्कालीन फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (nana patole slams devendra fadnavis over zoting committee report)
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची चौकशी करणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्यानंतर पुन्हा सापडला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. देवेद्र फडणवीसांनी बहुजन नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. खडसेंचं राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. फडणवीस सरकारमधील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन अनेक मंत्री अडचणीत येतील, असं सांगतानाच झोटिंग समितीचा अहवाल वाचला नाही. तो पुढे येईल तेव्हा त्यातील फार्स कळून येईल, असं पटोले म्हणाले.
2014मध्ये विश्वासघात झाला
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप करतानाच काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट केली. स्वबळावर लढायचं की नाही ही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी राहील. आमची लाईन तयार आहे. आम्ही अनेक वेळा ठेच खाल्ली आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी उभे राहणार आहोत. 2014 मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला. तसा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी राहणार आहोत. जो काही निर्णय घ्यायचा तो पार्टी स्टॅटेजीच्या आधारे घेऊ, असं पटोले म्हणाले.
भाजपवर हल्ला करण्याची जबाबदारी
माझ्यावर भाजपवर हल्ला करण्याची जबाबदारी दिली आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादीवर टीका करण्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. मी तसे करणारही नाही. कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना आमचे मित्र पक्ष आहेत. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर थेट हल्ला करत असतो, असं पटोले यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील नेता राष्ट्रपती झाला तर आनंदच
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला आनंद होईल. महाराष्ट्रातील नेता राष्ट्रपती होत असेल तर आनंदच होईल. पण राष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय पातळीवर काही प्रक्रिया सुरू झाली असेल तर मला त्याबाबत माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फेरबदलाची चर्चा नाही
राज्याच्या मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबत काय सांगाल? असं पटोले यांना विचारण्यात आलं. त्यावर सरकारमधील फेरबदलाची काहीच चर्चा नाही, हायकमांड त्यावर निर्णय घेतील. मात्र, फेरबदलाविषयी आघाडीत चर्चा नाही. त्यावर बोलता येणार नाही, असं सांगतानाच मंत्रीपदाची मी कधीही मागणी केली नाही. हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल. पक्षाने आदेश दिल्यावर मी विधानसभा अध्यक्षपद सोडलं. आताही हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य करू, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
राज्यपालांना महागाईविरोधात निवेदन देणार
वाढत्या महागाईच्या विरोधात उद्या गुरुवारी आम्ही राज्यपालांना भेटून निवेदन देणार आहोत. काँग्रेसचे काही मंत्री आणि नेते दुपारी 12 वाजता राज्यपालांची भेट घेतील. हे निवेदन देण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे सायकलवरून जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. (nana patole slams devendra fadnavis over zoting committee report)
संबंधित बातम्या:
काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका, मला कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नानांचं पवारांकडे बोट?
पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही: चंद्रकांत पाटील
(nana patole slams devendra fadnavis over zoting committee report)