नंदुरबारमध्ये भाजपला धक्का, जिल्हा परिषदेच्या तीन जागा गमावल्या, ZP वर काँग्रेस सेनेचा झेंडा
नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून 11 पैकी भाजपच्या 11 जागा निवडून येतील असा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपच्या 4जागा निवडून आल्या आहेत तर त्यांनी 3 जागा गमावल्या आहेत.
नंदुरबार: ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 11 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्यांची निवडणूक झाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं लागलेल्या या निवडणुकीमध्ये कुठे ही प्रचारात ओबीसी आरक्षणाचा मुदा प्रभावी दिसला नाही. स्थानिक मुद्यावर निवडणुकीचा प्रचार झाला. नंदूरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागा रद्द झाल्या होतं. त्यामध्ये भाजपच्या 7 सदस्यांना फटका बसला होता. नंदुरबार जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला असून 11 पैकी भाजपच्या 11 जागा निवडून येतील असा विश्वास हिना गावित यांनी व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपच्या 4जागा निवडून आल्या आहेत तर त्यांनी 3 जागा गमावल्या आहेत.
भाजपला फटका, काँग्रेसनं सत्ता राखली
नंदूरबार जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलेली होती. भाजपा नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. तर, शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा राम रघुंशी यांनी डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांचा कोपर्ली गटात पराभव केला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहिणी गीता गावीत यांचा खापर गटात विजय झाला आहे.
मुलीचा विजय, पुतण्याचा पराभव
भाजपा नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून शिवसेनेकडून विजयी झाले आहेत. डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांचा राम रघुवंशी यांनी पराभव केला.
नंदुरबार जिल्ह्यातील पक्षीय बलाबल
काँग्रेस : 25 भाजपा : 20 शिवसेना : 8 राष्ट्रवादी : 3
इतर बातम्या:
अमोल मिटकरींचा गावातच पराभव, बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ची धडाकेबाज एण्ट्री
Nandurbar Zp Election live updates counting BJP lost three seats in Nandurbar Congress Shivsena increase their number