Eknath Shinde : नारायण पाटील शिंदे गटात सामील, “म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत”, पाटलांचं स्पष्टीकरण

| Updated on: Jun 28, 2022 | 1:59 PM

Eknath Shinde: करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील देखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

Eknath Shinde : नारायण पाटील शिंदे गटात सामील, म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत, पाटलांचं स्पष्टीकरण
Follow us on

करमाळा : दिवसेंदिवस शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. आतापर्यंत मंत्री आणि आमदारांचा पाठिंबा मिळत होता. आता तर माही आमदारांनीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नेतृत्व स्विकारलं आहे. सोलापुरातून शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. कारण करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटीलदेखील (Narayan Patil) शिंदे गटात सामील झाले आहेत. 2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुक लढविली होती.परंतू त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. अन् त्यांनी आज आपल्या या नाराजीला वाट मोकळी करून दिली. त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.

नारायण पाटील शिंदे गटात सामील

करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. 2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुक लढविली होती.परंतू त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते. अन् त्यांनी आज आपल्या या नाराजीला वाट मोकळी करून दिली. त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.

“राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना फक्त भरीव निधी दिला आहे. यावेळी मात्र सेनेच्या आमदारांना कुणीच वाली नव्हता, त्यामुळे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. ‘होय मी एकनाथ शिंदे साहेबांसोबतच आहे’, असं नारायण पाटील यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

मी आजही शिवसेनेत- शिंदे

“मी आजही शिवसेनेत आहे. यात शंका नाही. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत, असं सांगतानाच आमची पुढची भूमिका तुम्हाला सांगत राहू. आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका सांगत राहतील”, असं एकनाथ शिंदे यांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.