शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं : नारायण राणे

तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिलं आहे. सावंत यांनी किती पैसे दिलेत हे जगजाहीर झालं आहे. शिवसेनेत (Shiv sena) पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan rane accused Shiv sena) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) केला आहे.

शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं : नारायण राणे
Follow us
| Updated on: Sep 22, 2019 | 8:58 AM

पुणे : तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिलं आहे. सावंत यांनी किती पैसे दिलेत हे जगजाहीर झालं आहे. शिवसेनेत (Shiv sena) पैसे घेऊन मंत्री, आमदार, महापौर केलं जातं, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan rane accused Shiv sena) यांनी शिवसेनेवर (Shiv sena) केला आहे. नारायण राणेंच्या या आरोपानंतर राजीकय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पुण्यातील इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये नारायण राणे बोलत होते.

आमदार, मंत्रीपदं पैसे घेऊन दिली जात असल्याने शिवसेना कमजोर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून शिवसेनेला शेळी किंवा मांजर म्हटलं तरी हरकत नाही, शिवसेनेत वाघ राहिले नसून शेळ्या-मेंढ्या झाल्याचा आरोपही नारायण राणेंनी (Narayan rane accused Shiv sena) केला आहे.

भापजा प्रवेशाला शिवसेना आडकाठी

माझ्या भाजप प्रवेशाला शिवसेनाच आडकाठी करत आहे. मला भाजपनं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलवल्यानंतर मी गेलो. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केलं आहे. मी भाजपात जाणार हे नक्की, असल्याचं ही राणेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे सोडले तर सर्व राजकीय पक्षात माझे चांगले संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं.

मला मंत्रीपदही मिळणार होतं, शपथ घ्यायचा दिवस ठरला होता. मात्र शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. त्यानंतर मला मंत्रीपद देण्याचा निर्णय बारगळल्याचा आरोप राणे यांनी केला.

शिवसेनेला भुजबळ चालतात, पण राणे नको

शिवसेना छगन भुजबळांना शिवसेनेत घ्यायला तयार आहे. शिवसेनेला प्रदीम शर्मा, भुजबळ चालतो फक्त नारायण राणे चालत नाही. त्यांना राणेंची फार भीती वाटते. मात्र मलाच शिवसेनेत जायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेस जबाबदार

काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेस जबाबदार आहे. सर्वसामान्यांचा संपर्क तुटला आणि भ्रष्टाचार वाढवून फक्त पैशाने काम करण्याची सवय लागल्याने अधोगती झाली. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधीं प्रभावहीन झाला, असंही नारायण राणेंनी यावेळी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.