आता स्वस्थ बसणार नाही, सालीयान प्रकरणातील ‘त्या’ मंत्र्याला आणि अनिल परबांना नारायण राणेंचा थेट इशारा

राणे पहाटेच्या सुमारास मुंबई पोहोचले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिशा सालियान प्रकरणात नाव आलेल्या त्या मंत्र्याला आणि अनिल परब यांना नारायण राणे यांनी थेट इशारा दिलाय. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं सूचक वक्तव्य राणेंनी केलंय.

आता स्वस्थ बसणार नाही, सालीयान प्रकरणातील 'त्या' मंत्र्याला आणि अनिल परबांना नारायण राणेंचा थेट इशारा
नारायण राणे पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 5:06 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन दिला. त्यानंतर आता नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवलाय. राणे पहाटेच्या सुमारास मुंबई पोहोचले. त्यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिशा सालियान प्रकरणात नाव आलेल्या त्या मंत्र्याला आणि अनिल परब यांना नारायण राणे यांनी थेट इशारा दिलाय. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं सूचक वक्तव्य राणेंनी केलंय. (Narayan Rane’s warning to Minister who involed in Disha Saliyan case and Anil Parbhan)

अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना तीन प्रश्न

पत्रकार परिषदेत बोलताना नारयण राणेंनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. “1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्रीय सण माहीत नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. ते महाशय काय बोलले, म्हणजे मुख्यमंत्री, सेना भवनाबद्दल असं कोणी भाषा करेल तर त्याचं थोबडं तोडा, आदेश दिले. हा क्राईम नाही? 120 बी होत नाही? पत्रकारांनी मला शिकवावं. नाहीतर मी वकीलच डाव्या बाजूला घेऊन बसलो आहे. दुसरं एक वाक्य आहे, योगी साहेबांबद्दल. हा योगी आहे का ढोंगी? चपलाने मारलं पाहिजे. एका मुख्यमंत्र्याला म्हणतात चपलाने मारलं पाहिजे. तिसरा प्रश्न अमित शाह यांच्याबद्दल, मी आणि अमित शाह यांनी बसून ज्या काही पुढच्या वाटचालीबद्दल आखणी केली होती आता मी निर्लज्जपणाने हा शब्द मुद्दाम वापरतो. हा अनपार्लीमेंट शब्द नाही? असे सवाल राणे यांनी केले आहेत.

मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला?

“या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.

संबंधित बातम्या :

सिंधुदुर्गात जमावबंदी; राणे म्हणतात, सिंधुदुर्गापासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार, त्यात व्यत्यय येणार नाही

राणे सत्तेच्या जोरावर तत्त्वज्ञान पाजळत होते, कालच्या प्रकाराने गुर्मी उतरवली; वैभव नाईकांचा घणाघात

Narayan Rane’s warning to Minister who involed in Disha Saliyan case and Anil Parbhan

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.