Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊतांचं मोदींना पत्र, नेमकं त्यांना उत्तर काय मिळालं?

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. दरम्यान, राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी एक पत्र पंतप्रधान मोदींना पाठवलं आहे.

नारायण राणे यांच्याविरोधात विनायक राऊतांचं मोदींना पत्र, नेमकं त्यांना उत्तर काय मिळालं?
शिवसेना खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:36 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता दिसून येत आहे. राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर अखेर त्यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्या जामीनासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. तत्पूर्वी नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. दरम्यान, राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी एक पत्र पंतप्रधान मोदींना पाठवलं आहे. (Vinayak Raut’s complaint against Union Minister Narayan Rane to PM Narendra Modi)

‘पोलिसांवर कुठलाही दबाव नाही’

“महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे. मुंबई, महाराष्ट्रातील पोलीस कायद्याच्या बाहेर जाऊन काही काम करत नाहीत. नारायण राणे यांना जी अटक झालेली आहे ती संविधानाप्रमाणेच आहे. पोलिसांवर कुठलाही दबाव नाही. पोलीस कायद्याचे रक्षणकर्ते आहेत आणि त्यांनी कायद्याचं रक्षण केलेलं आहे. राज्यातील वातावरण चिघळण्याचा प्रश्न येत नाही. करावं तसं भरावं. वातावरण चिघळवण्याची सुरुवातच नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांना अटकाव बसण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुविचारी वृत्तीचे, सज्जन प्रवृत्तीचे आणि लोकांच्या विकासाचा ध्यस घेतलेले आहेत. त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं पण जे कायद्याचे रक्षणकर्ते आहेत, त्यांनी याची गंभीर दखल घेऊन अटक केली आहे. यावरुन वातावरण चिघळणार असेल तर त्याची जबाबदारी ही सर्वस्वी भाजपची असेल”, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिलाय.

विनायक राऊतांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार

त्याचबरोबर “केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या नारायण राणे यांचं अशाप्रकारचं वर्तन मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिलं. मला अभिमान वाटतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अवघ्या 10 मिनिटांत त्या पत्राची दखल घेतली. दुपारी 2 वाजून 26 मिनिटांनी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान मोदी आता एका बैठकीत आहेत, तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्या. त्यांच्याकडे मी तुमच्या तक्रारीचं पत्र पाठवलं आहे, असं उत्तर मला अवघ्या 10 मिनिटांत मिळालं. पण मला सांगायचं आहे की, राणे यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी”, अशा शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला चढवलाय. त्याचबरोबर खास करु मी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करेन की त्यांनी नारायण राणे यांच्या अशा अश्लाघ्य वक्तव्याचं समर्थन केलं नाही. ते राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाहीत हे त्यांनी स्पष्ट केल्याचंही राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

कायदे आणि नियम फक्त भाजपलाच का? नारायण राणेंच्या अटकेवरुन चित्रा वाघ आक्रमक

भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर निदर्शने करणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

MP Vinayak Raut’s complaint against Union Minister Narayan Rane to PM Narendra Modi

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.