मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तर अद्यापही रेड झोनमध्ये आहे. यावरुन खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ दिली. त्याच्या बदल्यात शिवसेनेनं कोरोना काळात सिंधुदुर्गात 901 तर रत्नागिरीमध्ये 1 हजार 561 मृत्यू दिले, अशी टीका राणे यांनी केलीय. (Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray over corona outbreak in Ratnagiri, Sindhudurg)
‘सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ दिली. त्याच्या बदल्यात शिवसेनेनं कोरोना काळात सिंधुदुर्गात 901 तर रत्नागिरीमध्ये 1 हजार 561 मृत्यू दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मा. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?’, असा सवाल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांना केलाय.
दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मा. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 17, 2021
दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी संध्याकाळी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू इथल्या निवासस्थानी भेट घेतली. सिंधुदुर्गातील कोरोना प्रादुर्भावावर राणे आणि टोपे यांच्यात जवळपास 3 तास चर्चा झाली. नारायण राणे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन आले आहेत. त्यावेळी राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर काल आरोग्यमंत्री टोपे आणि राणे यांची भेट झाली. या भेटीत कोकणातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अजून कोणत्या प्रभावी उपाययोजना करण्यात येतील याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो”, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला एकप्रकारे सावधगिरीचा इशाराही दिलाय.
ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 11, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO: 5 जुलैपर्यंत 6 मागण्या मान्य करा, उद्रेक झाल्यास…; उदयनराजेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम
सक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांनासोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन
Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray over corona outbreak in Ratnagiri, Sindhudurg