नारायण राणे मालवणी पोलीस स्टेशनला पोहोचले; दिशा सालियन प्रकरणात आपली बाजू मांडणार
नारायण राणे आणि नितेश राणे आज मालवणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. मालवणी पोलीस स्टेशनला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यावर नारायण राणे आणि नितेश राणे आज त्यांची बाजू पोलिसांसमोर मांडणार आहेत. ते आपली बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला होता. त्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दिशा सालियान आत्महत्येप्रकरणी वक्तव्य केल्यामुळं नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता. दरम्यान शुक्रवारी याप्रकरणात दिंडोशी न्यायालयानं नारायण राणे आणि नितेश राणे यांना दिलासा दिला आहे. मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत या प्रकरणात नारायण राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता खुद्द नारायण राणे आणि नितेश राणे आज मालवणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. मालवणी पोलीस स्टेशनला नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यावर नारायण राणे आणि नितेश राणे आज त्यांची बाजू पोलिसांसमोर मांडणार आहेत. ते आपली बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता . दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली आहे. ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर सालियन कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.
राणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले
दरम्यान या प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला एफआयर दाखल झाला होता. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना दिंडोशी न्यायालयानं शुक्रवारी राणे पिता -पुत्राला दिलासा दिला. 10 मार्चपर्यंत नारायण राणे किंवा नितेश राणे यांना अटक करू नये असे आदेश न्यायलयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान आता या प्रकरणात आपली बाजू मांडण्यासाठी नारायण राणे मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.
संबंधित बातम्या
VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल
ओबीसी संदर्भातील कायद्यावर सोमवारी चर्चेची शक्यता, विजय वडेट्टीवारांनी आणखी काय सांगितलं?