चेंबूरमधील ‘तो’ व्यक्ती मित्रच नाही तर आमचा कार्यकर्ता, नवाब मलिकांच्या आरोपांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर

चेंबूरमधील तो व्यक्ती आमचा मित्रच नाही तर तो कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य चेंबूरमध्ये गेलंय. तो दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो. भुजबळांना अटक का झाली? भुजबळ तीर्थयात्रेला गेले होते का? ते तर आता फार बोलततात, अशा शब्दात राणे यांनी मलिकांना उत्तर दिलंय.

चेंबूरमधील 'तो' व्यक्ती मित्रच नाही तर आमचा कार्यकर्ता, नवाब मलिकांच्या आरोपांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर
नवाब मलिक, नारायण राणे
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 6:11 PM

मुंबई : ‘नीरज गुंडे हा मागच्या सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट प्रवेश होता. त्या व्यक्तीचं आणि समीर वानखेडे यांचा संबंध काय?’ असा सवाल करत नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिकांच्या या आरोपांना आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Narayan Rane reply to Nawab Malik’s allegations against Devendra Fadnavis and Neeraj Gunde)

चेंबूरमधील तो व्यक्ती आमचा मित्रच नाही तर तो कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य चेंबूरमध्ये गेलंय. तो दोन नंबर वाल्यांची चांगली माहिती देतो. भुजबळांना अटक का झाली? भुजबळ तीर्थयात्रेला गेले होते का? ते तर आता फार बोलततात, अशा शब्दात राणे यांनी मलिकांना उत्तर दिलंय. मलिक यांनी अधिवेशनात भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा हल्लाबोल केला होता. त्यावर बोलताना अधिवेशन म्हणजे काय, कुणाचे अधिवेशन, अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? आमचेही 105 आहेत. समीर वानखेडेंनी काय केलं? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करतात. मंत्र्यांनी हजारो कोटी कुठून आणले? भ्रष्टाचारच केला नाही, त्यामुळे लागू द्या मागे, असं म्हणत राणे यांनी वानखेडेंची पाठराखण केली.

नवाब मलिकांचा फडणवीसांवर निशाणा

नवाब मलिक यांनी चेंबूरमधील एका व्यक्तीचं नाव घेत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ‘नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही’, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केलाय.

‘फडणवीसांकडून त्रास देण्याचा प्रयत्न’

इतकंच नाही तर मी माध्यमांमध्ये अनेक विषयांवर बोलत होतो. त्यामुळे मला कशाप्रकारे त्रास देता येईल, याचा प्रयत्न झाला. माझ्या मुलाने जी जागा कुर्ल्यात खरेदी केली होती त्यावेळी जाणीवपूर्वक त्यावर आरक्षण टाकलं. आम्हाला ती डेव्हलप करता येत नाही. त्यांना एवढंच सांगणं आहे की, कितीही आरोप करा. आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाहीत. उलट मोहित कंबोज चोर आहे, त्याचा नातेवाईकही चोर आहे. माझ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मलिकांनी केलाय.

इतर बातम्या : 

‘एक अधिकारी आपली ड्यूटी करतोय, तर सरकारमधील मंत्री त्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देतोय’

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘असे नेते आमच्या खिशात’; आता नवाब मलिक म्हणतात, ‘मी वाट पाहतोय’!

Narayan Rane reply to Nawab Malik’s allegations against Devendra Fadnavis and Neeraj Gunde

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.