शर्मिला ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, ‘पुरावा असेल तर दाखवा’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची पाठराखण केलीय. "आदित्य ठाकरे असं काही करेल, असं आपल्याला वाटत नाही", असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नारायण राणेंनी शर्मिला ठाकरेंना आदित्य ठाकरे निर्दोष असल्याचा पुरावा सादर करण्याचं आवाहन केलं आहे.

शर्मिला ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यावर नारायण राणे म्हणाले, 'पुरावा असेल तर दाखवा'
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 8:04 PM

गोविंद ठाकुर, Tv9 मराठी, मुंबई | 16 डिसेंबर 2023 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावच लागेल”, असा दावा केला. “मी पुन्हा सांगतो, दिशा सालियनची हत्या झाली आहे. मी आधीपासून सांगत आलो आहे की, दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची हत्या झाली आहे. दोघांची हत्या झाली तेव्हा त्यांचं सरकार होतं. दोघांच्या हत्येत एका मंत्र्याचा हात आहे, असं मी म्हणालो होतो. आधी तपास झाला नाही. पण आता तपास होत आहे तर खरं समोर येईल. आदित्य ठाकरेंना जेल जावच लागेल”, असं वक्तव्य नारायण राणे यांनी आज केलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची पाठराखण केलीय. “आदित्य ठाकरे असं काही करेल, असं आपल्याला वाटत नाही”, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मी कुणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. त्यांच्याजवळ पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा. आदित्य ठाकरे साधासुदा मुलगा आहे. असं काही करणार नाही. आदित्य सकाळी उठून देवाचं नाव घेतो. दिशा सालियन प्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. ही एसआयटी सर्व बाहेर आणणार”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

‘लोकसभेत भाजप 400 जागा जिंकणार’

काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात यात्रा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राहुल गांधींच्या यात्रेचा काँग्रेसला काहीच फायदा होणार नाही, असा दावा केला. “राहुल गांधी यांनी याआधीच अनेक यात्रा काढल्या आहेत. पण 5 राज्यांचे निवडणुकांचे निकाल पाहा. काय फरक पडला? आमचा 3 राज्यांमध्ये विजय झाला. लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व रेकॉर्ड मोडणार आहे. भाजप 400 जागांवर जिंकून योणार, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील”, असा मोठा दावा नारायण राणेंनी केला.

हे सुद्धा वाचा

‘उद्धव ठाकरेंना दु:ख होतंय की…’

उद्धव ठाकरे यांच्या धारावी वाचवा आंदोलनावर देखील नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. “उद्धव ठाकरे जवळपास अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. तेव्हा धारावीच्या नागरिकांना घर का दिलं नाही? योजना का बनवली नाही? आता उद्धव ठाकरेंना दु:ख होतंय. कारण TDR निघून गेला याचं त्यांना दु:ख होत आहे. लोकांच्या हितासाठी हे आंदोलन नाही तर स्वत:च्या हाताला होणारा फायदा निसटून गेला त्याचं हे दु:ख आहे. त्यामुळे ते आज अदानींच्या विरोधात रॅली काढत आहेत”, अशी टीका नारायण राणेंनी केली.

‘उद्धव ठाकरेंना मी नेता मानत नाही’

“उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही. ते काही समाजसेवक नाहीत. ते लोकांच्या हितासाठी काम करणारा सेवक नाहीत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या पूर्ण आयुष्यात दहशतवादच्या विरोधात होते. ते आंतकवादच्या विरोधात लढले. त्यामुळे त्यांना सुरक्षा दिली गेली. पण उद्धव ठाकरे त्याच आतंकवादच्या विरोधात पार्टी करत आहेत. नवाब मलिका असतील किंवा इतर लोक, शिवसेनेची विचारधारा दहशतवादाच्या विरोधात होती. पण उद्धव ठाकरेंची विचारधारा कसंही करुन पैसा कमवण्याची आहे. उद्धव ठाकरेंना देश आणि हिंदुत्वचं काहीच पडलेलं नाही. उद्धव ठाकरेंना मी नेता मानत नाही”, असं नारायण राणे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.