वरुण सरदेसाई सांभाळून बोल, तू लहान आहेस, आमच्याकडे तोंड बंद करण्याचे उपाय आहेत : नारायण राणे

| Updated on: Aug 04, 2020 | 5:25 PM

नारायण राणे यांनी आज (4 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली (Narayan Rane slams Varun Sardesai).

वरुण सरदेसाई सांभाळून बोल, तू लहान आहेस, आमच्याकडे तोंड बंद करण्याचे उपाय आहेत : नारायण राणे
Follow us on

मुंबई : “युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर टीका केली (Narayan Rane slams Varun Sardesai). त्यांनी ज्या शब्दात टीका केली त्यावर मी त्यांना एवढंच सांगेल की, तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे. त्यामुळे तोंड सांभाळून बोल”, असा इशारा भाजप नेते नारायण राणे यांनी दिला. नारायण राणे यांनी आज (4 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली (Narayan Rane slams Varun Sardesai).

“शिवसेनेचा अन्याय पाहून सगळे गेलेत. शिवसेनेत आता नवे केलेक्टर ऑफिसर आले आहेत. त्यांच्या कुंडल्या आम्हाला माहिती आहेत. ते कुठे जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कुणाशी तडजोड करतात, ते सर्व आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर ज्या शब्दात टीका केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी”, असं नारायण राणे यांनी आवाहन केलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली होती. या टीकेला शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं. शिवसेनेकडून सर्वातआधी युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं. त्यानंतर शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील अमृता फडणवीसांवर हल्लाबोल केला होता.

अमृता फडणवीसांचे ट्विट

“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं.

वरुण सरदेसाई यांचं प्रत्युत्तर 

युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!” अशा शब्दात सरदेसाई यांनी आव्हान दिलं.

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “मुंबई पोलिसांवर आरोप करुन बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करु इच्छिते की, त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडावी. त्यांनी खासगी सुरक्षा एजन्सींकडे जावं, जिथे त्यांना सुरक्षित वाटेल. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने अशाप्रकारचं वक्तव्य करणं लाजिरवाणं आहे”, असा घणाघात प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.