सिंधुदुर्गात राणेंना झटका, 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; नितेश राणे म्हणतात ‘येड्यांची जत्रा’!

सिंधुदुर्गात नारायण राणेंना शिवसेनेनं मोठा झटका दिल्याचं समजतंय. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय.

सिंधुदुर्गात राणेंना झटका, 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; नितेश राणे म्हणतात 'येड्यांची जत्रा'!
राणे समर्थक दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 7:37 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेनं राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर आता सिंधुदुर्गात नारायण राणेंना शिवसेनेनं मोठा झटका दिल्याचं समजतंय. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार करत येड्यांची जत्रा अशी उपमा दिली आहे. (Two BJP corporators from Devgad join Shivsena in the presence of CM Uddhav Thackeray, )

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तसंच कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आलाय.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात येत आहे. भविष्यात कणकवली मतदारसंघातील नितेश राणे यांचे निष्ठावंत म्हणवणारे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील आणि कणकवली शिवसेनामय होईल, असा दावाही करण्यात येतोय.

नितेश राणेंकडून शिवसेनेवर पलटवार

दरम्यान, नितेश राणे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे शिवसेनेचेच असल्याचा दावा केलाय. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधलाय. ‘आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून.. आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेड बनवायच. यालाच म्हणतात “येड्यांची जत्रा” !!’ असं ट्वीट नितेश राणे यांनी केलंय.

निलेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, दुसरीकडे रुग्णसंख्या घटल्यामुळे कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत. त्यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. ‘एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत आहेत की कोरोनाचं संकट अजून गेलेलं नाही, तिसरी लाट येऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला गणपती सणाच्या तोंडावर कोविड सेंटर बंद करण्याचा पराक्रम ठाकरे सरकार करतंय’, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलंय.

इतर बातम्या :

विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, मेटेंचा आरोप; आता वडेट्टीवारांचं जोरदार प्रत्युत्तर

एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट, जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनेचा शुभारंभ

Two BJP corporators from Devgad join Shivsena in the presence of CM Uddhav Thackeray,

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.