नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी नारायण राणे शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार आहेत. (narayan rane)
मुंबई: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा येत्या 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी नारायण राणे शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार आहेत. राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर येणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंची ही खेळी असल्याचीही जोरदार चर्चा आहे. (narayan rane will start jan ashirwad rally after pay homage balasaheb thackeray)
येत्या 19 ऑगस्टपासून नारायण राणेंची जन आशीर्वाद रॅली सुरू होणार आहे. त्याच दिवशी ते दिल्लीतून मुंबईत येणार आहेत. विमानतळाहून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी ते दादरला जाणार आहेत. राणे पहिल्यांदाच स्मृती स्थळावर येणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राणेंचं शक्तीप्रदर्शन
लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्याच्या मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. 19 ते 26 ऑगस्टपर्यंत राणेंची ही यात्रा सुरू राहणार असून त्या माध्यमातून ते शक्तिप्रदर्शनही करणार आहेत. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून 19 आणि 20 तारखेला मुंबईत शक्तिप्रदर्शन होईल. 21 तारखेला वसई-विरार आणि 23 ते 26 ऑगस्ट कोकणात जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. त्यामुळे राणेंच्या या यात्रांना कसा प्रतिसाद मिळतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मिशन 114
दिल्ली नेतृत्वाने राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने त्यांच्याकडे मिशन 114 सोपवलं आहे. मुंबई महापालिकेत 114 जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी राणेंवर देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे आदेशच राणेंना देण्यात आले आहेत. शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचं भाजप श्रेष्ठीने ठरवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे राणेंच्या या मिशन 114 ला किती यश मिळतं हे आगामी काळातच सिद्ध होणार आहे. मात्र, महापालिका निवडणुकीत राणेंची एन्ट्री झाल्याने ही निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत संघर्षाची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जय्यत तयारी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची 7 दिवस यात्रा होणार आहे. एकूण 170 हून अधिक भागांना राणे भेट देणार आहेत. मुंबई व कोकण भागात त्यांची जन आशीर्वाद यात्रा होणार आहे. राणे यांच्या यात्रेचे प्रमुख म्हणून प्रमोद जठार व सहप्रमुख म्हणून आमदार सुनिल राणे काम पाहणार आहेत. या यात्रेत भाजपसह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्तेही भाग घेणार आहेत. 19 तारखेच्या यात्रेसाठी आतापर्यंत 500 गाड्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी मुंबईत राणेंचं मोठं शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (narayan rane will start jan ashirwad rally after pay homage balasaheb thackeray)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 17 August 2021 https://t.co/iNdOKxWWxi #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 17, 2021
संबंधित बातम्या:
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला सोमवारपासून सुरुवात; ठाण्यातील आनंदनगर चेक नाका येथून शुभारंभ!
भाजपचं मिशन ‘जन आशीर्वाद’, चार केंद्रीय मंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार; आघाडीला शह देण्याची तयारी?
मुंबई ते कोकण, नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा ठरली, राज्य सरकारचे वाभाडे काढणार!
(narayan rane will start jan ashirwad rally after pay homage balasaheb thackeray)