मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नारायण राणेंच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा! कोण आहेत विद्याधर अनास्कर?

ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अनास्कर यांना आता राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. अनास्कर हे उच्चशिक्षित असून, गेल्या 30 वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नारायण राणेंच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा! कोण आहेत विद्याधर अनास्कर?
विद्याधर अनास्कर यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 9:19 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील कट्टरता संपूर्ण राज्याला माहिती आहे. मात्र, अशास्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अनास्कर यांना आता राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. अनास्कर हे उच्चशिक्षित असून, गेल्या 30 वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. (Vidyadhar Anaskar has been appointed as the chairman of the state co-operative council)

अनास्कर यांनी सहकार क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. अनास्कर हे सध्या सहकारी बँकेवर प्रशासक आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्य सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं त्यांना प्रशासक म्हणून कायम ठेवलं.

अनास्कर हे राणेंचे जवळचे मित्र

विद्याधर अनास्कर हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जवळचे मित्र आहेत. राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अनास्कर यांचा आदराने उल्लेख केलाय. राणेंचे मित्र असल्या कारणाने अनास्कर यांना राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक पदावरुन पायउतार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचं काम पाहून राज्य सहकारी बँकेवर त्यांना कायम ठेवलं. इतकंच नाही तर आता अनास्कर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी केली आहे.

सहकार परिषद नेमकं काय काम करते?

1. सहकारी चळवळीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणं 2. सहकारी चळवळीचा आढावा घेणं, राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे 3. सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग आणि उपाय सुचविणे 4. राज्य सरकार परिषदेकडे निर्देशित करेल अशा सर्व बाबींवर राज्य सरकारला अहवाल देणे 5. राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना आणि धोरणे यांची शिफारस करणे 6. समाजातील मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान योजनांचे मुल्यांकन करणे व नवीन योजना सुचविणे 7. सहकारी पध्दतीद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देणे 8. विभागामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचं काम हाती घेणे

इतर बातम्या :

Pune Corona Update : पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांमध्ये चर्चा

शिवसेनेचा नवा दारुगोळा किती ‘स्फोटक’? उद्धव ठाकरे सेनेची सूत्रं मुलांकडे देण्याच्या तयारीत? वाचा सविस्तर

Vidyadhar Anaskar has been appointed as the chairman of the state co-operative council

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.