‘सुशांतसिंग आणि दिशा सालियनची आत्महत्या नव्हे तर हत्याच’ राणेंचं खळबळजनक ट्वीट, ‘मातोश्री’वरील चौघांसाठी ईडी नोटीस तयार असल्याचाही दावा
राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊतांना उद्देशून एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्या प्रकरणाची चौकशी परत होईल, असा दावा नारायण राणेंनी केलाय.
मुंबई : राज्यातील राजकारण एका स्फोटक वळणावर येऊन ठेपल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कारण किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊतांवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नीवर आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा आरोप केलाय. त्यानंतर संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) देखील उडी घेतली आहे. राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आता राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊतांना उद्देशून एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्या प्रकरणाची चौकशी परत होईल, असा दावा नारायण राणेंनी केलाय.
नारायण राणेंचं नेमकं ट्वीट काय?
‘खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे.
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022
‘मातोश्री’वरील चौघांना ईडीची नोटीस जाणार?
दरम्यान, याच ट्वीटमध्ये नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीचाही उल्लेख केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राणे म्हणाले की, ‘मातोश्री’वरील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. राणेंच्या ट्वीटमुळे आता मातोश्रीवरील नेमक्या कुणाला ईडीची नोटीस जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
‘ईडीवर बोलू नको, बिडी प्यायला लावतील’
नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, ‘विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस. जनतेच्या प्रश्नाचे विषय, आरोग्य खात्याच्या प्रश्नाबद्दल वृत्तपत्रांनी बातमी दिली, राज्याचा आरोग्यविभाग निधीअभावी अत्यवस्थ, अरे यावर काहीतरी बोल, राज्याची दयनीय अवस्था, प्रश्न सुटत नाही, एसटीचं आंदोलन सुरु आहे. पण काही नाही, इंडस्ट्री मिनीस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले. कंबोजने सांगितलं, चेक दिला संजय राऊतला. एका बाजूला पत्रकार आणि दुसऱ्या बाजूला छापखाना, आणि त्यांना माहितीय, आज ना उद्या जागा खाली होणार. आता शिवसेनेत कोण नाहीय, आधी बाळासाहेबांवर टीका केली, उद्धवजींवर टीका केली. आता एक आरोप झालाय. पण ईडीवर बोलू नको, विडी प्यायला लावतील. मी कुणाला घाबरत नाही, तू शिवसेनेत आला कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षांनी आला. आम्ही शिवसेनेसाठी वाटा दिला, तू 5 पैसे तरी दिले का?, असा खोचक सवालही राणेंनी राऊतांना विचारला होता.
इतर बातम्या :