AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TIME मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ’ उल्लेख, आता मोदी म्हणतात….

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध टाईम मॅग्झिनने आपल्या कव्हर पेजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिव्हायडर इन चीफ म्हटलं होतं. जगभरात टाईमच्या या कव्हर स्टोरीची चर्चा रंगली. पंतप्रधान मोदींनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले, “टाईम मॅग्झिन परदेशी आहे. लेखकाने स्वत: आपण पाकिस्तानातील राजकीय कुटुंबातून आल्याचं म्हटलं आहे. त्यांची विश्वासार्हता सांगण्यासाठी इतकंच पुरेसं आहे.” मोदींवरील डिव्हायडर […]

TIME मासिकात मोदींचा 'डिव्हायडर इन चीफ' उल्लेख, आता मोदी म्हणतात....
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध टाईम मॅग्झिनने आपल्या कव्हर पेजवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिव्हायडर इन चीफ म्हटलं होतं. जगभरात टाईमच्या या कव्हर स्टोरीची चर्चा रंगली. पंतप्रधान मोदींनी याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले, “टाईम मॅग्झिन परदेशी आहे. लेखकाने स्वत: आपण पाकिस्तानातील राजकीय कुटुंबातून आल्याचं म्हटलं आहे. त्यांची विश्वासार्हता सांगण्यासाठी इतकंच पुरेसं आहे.”

मोदींवरील डिव्हायडर इन चीफ ही टाईम मॅग्झिनची कव्हर स्टोरी आतिश ताशीर यांनी लिहिली होती. या लेखात आतिश ताशीर यांनी मोदींनी भारतात दुफळी निर्माण केल्याचं म्हटलं होतं. मॉब लिंचिंग, योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री करणं, मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूरला उमेदवारी यासारख्या घडामोडींचा उल्लेख आतिश ताशीर यांनी लेखात केला होता. शिवाय India’s Divider in Chief अर्थात भारताला विभागणारा प्रमुख असा उल्लेख मोदींचा केला होता. या कव्हर स्टोरीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं होतं.

याच अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षातील सत्ताकाळाचा आढावाही घेण्यात आला. ‘Can the World’s Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government?’ अशा मथळ्याखाली ‘टाईम’मध्ये विशेष रिपोर्ट छापण्यात आला आहे.

टाईम मॅग्झिनने पंतप्रधान मोदींवर यापूर्वीही कव्हर स्टोरी केली होती. त्यावेळी त्या लेखाचं शीर्षक  ‘मोदी इज इंडियाज बेस्ट होप फॉर इकोनॉमिक रिफॉर्म’ असं होतं. 2015 मध्ये हा लेख लिहण्यात आला होता.

दरम्यान, भाजपनेही या लेखावरुन मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा लेखकाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. या लेखाचा लेखक आतिश तासीर हे पाकिस्तानातील माजी नेते सलमान तासीर आणि पत्रकार तलवीन सिंह यांचे सुपुत्र आहेत, त्यांचा अजेंडा पाकिस्तानच आहे, असं भाजपने म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

मोदी ‘डिव्हायडर इन चीफ’, ‘टाईम’ मासिकाच्या कव्हरपेजची जगभर चर्चा  

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.