मनिषा कायंदे कट्टर शिवसैनिक होत्या, कशा काय शिंदे गटात गेल्या काही कळत नाही- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal on Manisha Kayande inter in Shivsena : मनिषा कायंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर माजी शिवसैनिकाकडून भाष्य, म्हणाले वाटलं नव्हतं...

मनिषा कायंदे कट्टर शिवसैनिक होत्या, कशा काय शिंदे गटात गेल्या काही कळत नाही- छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:41 AM

नाशिक : मनिषा कायंदे यांनी काल ठाकरे गटाला राम राम करत शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. “मनिषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या, काही कळत नाही. त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या. उद्धव ठाकरेसोबत राहतील असं वाटतं होतं. पण त्या शिंदेंसोबत गेल्या. त्यांनी हा निर्णय कसा घेतला कळत नाही”, असं म्हणत माजी शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कायंदेंच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया दिली आहे.

खरी शिवसेना कोण? हे निवडणुकीत लोक ठरवतील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्या मनात कायम राहील, असं छगन भुजबळ म्हणालेत.

आज शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिन आहे. सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा! शिवसेनेच्या पहिल्या वर्धापन दिनापासून आम्ही घोषणा देत जायचो. मिळेल त्या वाहनाने जायचो. 1978 साली मी शिवसेनेचा गटनेता झालो. बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवाजी पार्कवर बोलण्याची संधी दिली. शिवसेनेने अनेक जबाबदाऱ्या दिल्या, महापौर, आमदार झालो. शिवसैनिकांना शुभेच्छा! सर्व शिवसैनिकांना जय महाराष्ट्र, असं म्हणत छगन भुजबळांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही. शिवसेना फुटली, याचं वाईट वाटतंय. राजकारणात उलट सुलट बोलत असलो. कायद्याच्या उलट सुलट गोष्टी करत असलो तरी लोक ठरवतात. जनता ठरवेन खरी शिवसेना कोणती ते…, असं भुजबळ म्हणालेत.

शिवसैनिकांची एकी , बाळासाहेबांचा शब्द सुटला म्हणजे शिवसैनिक डू ऑर डाय हा परवलीचा शब्द घेवून निघायचे, कशाचीही पर्वा करत नव्हते. ती शिवसेना हळूहळू काही कारणाने विस्कळीत झाली. तरी सुद्धा शिवसेना अभेद्य राहावी, हीच आजही मनात इच्छा आहे, असं ते म्हणालेत.

ठाकरे गटाला गळती लागलेली असताना उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल असं विचारण्यात आलं उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे आजही जुने नेते, शिवसैनिक आहेत. ते चर्चा करू शकतात. गळती थांबवू शकतात. त्यामुळे मी त्यांना काही सल्ला देण्याची गरज नाही, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.