आघाडी सरकारच्या काळात अपूर्ण प्रकल्प तात्काळ पूर्ण करा, छगन भुजबळांचे आदेश
जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कामाचा धडाका (Chagan Bhujbal work at nashik) लावला आहे.
नाशिक : जिल्ह्याचं पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कामाचा धडाका (Chagan Bhujbal work at nashik) लावला आहे. त्यांच्या काळात मंजूर झालेले पण अपूर्ण असलेल्या प्रकल्पांना तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश भुजबळांनी दिले आहेत. दरम्यान मनसेच्या काळात शहरात उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची देखील भुजबळांनी पाहणी करुन अधिकाऱ्यांना या प्रकल्पांच्या देखभालीचे आदेश द्यावेत, यासाठी मनसे पदाधिकारी लवकरच भुजबळांची भेट घेणार आहेत.
गंगापुर धरणावर बांधलेलं बोट क्लब, कलाग्राम, एमटीडीसीचे निवास कक्ष, मनोरंजन पार्क, फाळके स्मारक या आणि अशा अनेक अडगळीत पडलेल्या प्रकल्पांना पुन्हा एकदा सुरु करण्याचे आदेश भुजबळांनी दिले आहे. त्यांच्या काळात पूर्ण झालेले पण सरकारनं अपूर्ण ठेवलेल्या कामांना तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान मनसेने आता भुजबळांकडे मनसेच्या काळात सुरु झालेल्या प्रकल्पांची पाहणी करुन, त्यांच्या देखभालीचे आदेश अधिकाऱ्यांना द्यावेत यासाठी भेट घेण्याची तयारी सुरु केली (Chagan Bhujbal work at nashik) आहे.
भुजबळांच्या काळात झालेल्या अनेक प्रकल्पांची सध्या बिकट परिस्थिती आहे. बोट क्लबसारखे प्रकल्प पूर्ण होऊन देखील दुर्लक्षित ठेवले गेले. तर इथल्या महागड्या बोटीच तत्कालीन पर्यटनमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात नेल्या. सरकारनं सुडबुद्धीनं जे काम मुद्दाम अपूर्ण ठेवलं. ते भुजबळ पूर्ण करतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.
मनसेच्या काळात नाशिकमधे बॉटनिकल गार्डन, उड्डानपुलाखालचं सुशोभीकरण, बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालय, गोदापार्क, व्हिक्टोरिया पुलावरचा वॉटर वॉल, पाण्यातला सर्वात उंच फाऊंटन असे अनेक कामं झाले. मात्र महापालिकेनंतर या प्रकल्पांकडे लक्षचं दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या आणि हतबल झालेल्या मनसैनिकांनी आता भुजबळांना हे प्रकल्प वाचवण्यासाठी साकडं घालण्याचं ठरवलं आहे. अर्थात या भेटीत नेमकं काय होणार? हे बघणं देखील महत्वाचं ठरणार (Chagan Bhujbal work at nashik) आहे.