PM Modi Pune Visit : पुणे दौऱ्याआधी संजय राऊत यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर पहिला शाब्दिक वार

Sanjay Raut on PM Narendra Modi Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा; संजय राऊताचा थेट निशाणा; म्हणाले...

PM Modi Pune Visit : पुणे दौऱ्याआधी संजय राऊत यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर पहिला शाब्दिक वार
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 10:01 AM

नवी दिल्ली | 01 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात असणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिला शाब्दिक वार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे, त्यावर तुमचं काय मत आहे, असं विचारल्यावर संजय राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात जाऊ शकतात. ते देशातील कोणत्याही भागात जाऊ शकतात. ते मणिपूर सोडून सगळीकडे जात आहेत. आमचं म्हणणं आहे, त्यांनी मणिपूरमध्ये जावं. पण ते पुण्यात येत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राशी एक वेगळं नातं आहे. पंतप्रधान मोदींनी कुठे जावं हे आम्ही ठरवत नाही. तर ते पंतप्रधान आणि त्यांचं कार्यालय ठरवतं. पंतप्रधान पुण्यात येत आहेत. तर त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच करतो, असं संजय राऊत म्हणालेत.

महिनाभराआधी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.पंतप्रधानांच्या भाषणानंतर काहीच दिवसात ज्यांच्यावर आरोप केले तेच लोक भाजपसोबत गेले. ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले तेच सगळे नेते आज मोदींसोबत व्यासपीठावर आहेत. तसंच समोर बसलेले असतील. त्याचा अर्थ तुम्ही लोकांना धमकावून तुमच्यासोबत घेत आहात, असं टीकास्त्र संजय राऊतांनी मोदींवर डागलं आहे.

ज्यांच्यावर आरोप केले तेच नेते आज तुमच्यासोबत असतील. तर तुम्ही लोकांना धमकावता आहात. किंवा तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर करत असलेले आरोप खोटे आहेत, असंही राऊत म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येणं ही चांगली गोष्ट आहे. विवादाची गोष्ट आहे ती शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं की नाही या संदर्भात… हा अराजकीय कार्यक्रम असल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे. तीन महिन्याआधी मी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आता त्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो नाही तर ते योग्य होणार नाही. कारण पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल असतो. त्यानुसार निमंत्रकच या कार्यक्रमाला हजर नसेल तर ते बरोबर दिसत नाही, असं पवार साहेबांनी सांगितलं आहे. पण लोकांचं असं म्हणणं आहे की सध्या परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी या कार्यक्रमाला जाणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पंरतप्रधानांचा पुणे दौरा आणि शरद पवार यांची भूमिका यावर भाष्य करण्यात आलं आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.