नवी मुंबई: नवी मुंबईवर माजी मंत्री गणेश नाईक (ganesh naik) यांचं वर्चस्व राहिलं आहे. नाईक यांच्याशिवाय नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) महापौर बनत नाही. नाईक ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता नवी मुंबई महापालिकेत असते. नाईक पूर्वी शिवसेनेत होते. तेव्हा नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेची (shivsena) सत्ता होती. नंतर नाईक राष्ट्रवादीत आले आणि नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. आता नाईक भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आपसूकच नवी मुंबईवर भाजपची सत्ता आली आहे. नवी मुंबई पालिकेत या पूर्वी वॉर्ड पद्धती होती. आता प्रभाग पद्धतीने नवी मुंबईत निवडणूक पार पडणार आहे. म्हणजे एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. प्रभाग पद्धतीचा प्रयोग नवी मुंबईत पहिल्यांदाच होत असल्याने या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2017च्या महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 16मधून विनया मनोहर माधवी या विजयी झाल्या होत्या. त्या शिवसेनेच्या नगरसेविका आहे. आता प्रभाग पद्धतीमुळे या प्रभागात तीन वॉर्ड येणार आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत अधिकच रंजक होणार आहे.
प्रभाग क्रमांक 16 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
नव्या प्रभाग क्रमांक 16मध्ये तीन आरक्षणे पडली आहेत. प्रभाग क्रमांक 16 मधील अ मध्ये ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलं आहे. ब वॉर्ड हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर क वॉर्ड हा जनरल झाला आहे. त्यामुळे या प्रभागावर महिलांचं वर्चस्व राहणार असल्याचं दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक 16 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
प्रभाग क्रमांक 16मध्ये 25 हजार 446 मतदार आहेत. त्यापैकी 1870 मतदार अनुसूचित जातीचे आहेत. तर 189 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत. म्हणजे या प्रभागातून कोणते तीन नगरसेवक निवडून द्यायचे हे या प्रभागातील 25 हजार मतदार ठरवणार आहेत.
प्रभाग क्रमांक 16 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
प्रभाग क्रमांक 16मध्ये कौपरखैरणे सेक्टर-1, सेक्टर-1 ए, सेक्टर-2, सेक्टर-2 ए, सेक्टर -3, सेक्टर -4 सेक्टर 4 ए आदी भाग येतात. सत्यम टॉवर, ज्ञानविकास चौक ते तीन टाकीपर्यंतचा भागही या मतदारसंघात येतो.