Navneet Rana : राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? माध्ममांशी बोलण्यास मज्जाव, तरिही बाईट दिला! अडचणी वाढणार?
जर कोर्टाने घातलेल्या अटी शर्थीचं उल्लंघन झालं असं आढळल्यास सोमवारी मुंबई पोलीस सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) सशर्त जामीन दिला होता. हा जामीन देताना कोर्टानं घातलेल्या अटी नवनीत राणा यांनी पाळल्या की नाहीत, यावरुन आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना घातलेल्या तीन महत्त्वाच्या अटींमध्ये राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र रविवारी नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतरही नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. यानंतर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनीदेखील राणा दाम्पत्यानं कोर्टानं घातलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची तपासणी करण्यात येईल. त्यानंतर जर त्यात आक्षेपार्ह काही बाबी आणि वक्तव्य आढळली, तर जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे.
पाहा मनिषा कायंदे यांनी नेमकं काय म्हटलं?
काय होती अट?
जामीन देताना राणा दाम्पत्याला माध्यमांशी संवाद साधू नये अशी अट कोर्टाकडून घालण्यात आली होती. मात्र राणा दाम्पत्याने जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधलाय. रविवारी रवी राणा आणि नवनीत राणा दोघांनीही माध्यमांसोबत बातचीत केली आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी माध्यमशी संवाद साधताना कोर्टाच्या अटी शर्थीचं उल्लंघन केलंय का याचा अभ्यास सुरू आहे. पोलीस आणि सरकारी वकिलांच्या माध्यमातून त्यांच्या मुलाखती आणि वक्तव्य तपासली जात आहेत.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया अनकट
जर कोर्टाने घातलेल्या अटी शर्थीचं उल्लंघन झालं असं आढळल्यास सोमवारी मुंबई पोलीस सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळतेय. कोर्टाच्या नियमांचं आणि अटींच उल्लंघन झालं असल्यास राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उद्या अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राणा दाम्पत्याला घालण्यात आलेल्या अटी कोणत्या?
- राणा दाम्पत्य जामीनावर असताना त्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव असेल. माध्यमांशी बोलल्यास जामीनअर्ज रद्द होणार
- 50 हजार रुपयांच्या जातमुचल्याकवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, याची हमी देताना फसवणूक झाल्यासही जामीन अर्ज रद्द होऊ शकतो
- तपासादरम्यान, पुराव्यांशी छेडछाड केली किंवा तपास प्रभावित होईल, असं कृत्य केलं, तरिदेखील पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागू शकते.
Video : किशोरी पेडणेकरांचा पलटवार
दिल्लीदरबारी दखल..?
दरम्यान, आमदार रवी राणा हे मुंबईत आपल्यासोबत जे काही झालं, याबाबत दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांना भेटून त्यांची माहिती देणार आहेत. या भेटीदरम्यान काय होतं, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे जामीनावर सुटल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या नवनीत राणांनाही आता डिस्चार्ज मिळालाय. या डिस्चार्जनंतर आता नवनीत राणांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.