Navneet Rana and Ravi Rana : ‘आई-वडील लवकर सुटावेत म्हणून प्रार्थना करते’, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुलीचं देवाकडे साकडं
29 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडतील आणि त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. अशावेळी आज राणा दाम्पत्याच्या लेकीने आपल्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना केलीय.
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार, असं थेट आव्हान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. त्यावरुन मुंबईत आणि राज्यभरातही मोठा राडा पाहायला मिळाला. अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्यानंतर कोर्टात हजर केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. काल राणा दाम्पत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर सुनावणी सुरु असतानाच राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केलीय. 29 एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपलं म्हणणं लेखी स्वरुपात मांडतील आणि त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. अशावेळी आज राणा दाम्पत्याच्या लेकीने आपल्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना केलीय.
आरोही राणा असं नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुलीचं नाव आहे. तीने आज आई वडिलांची कारागृहातून लवकर सुटका व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केलीय. माझी आई लवकर सुटावी, माझे वडील लवकर सुटावेत यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतेय, असं आरोहीने सांगितलं. नवनीत राणा आणि रवी राणा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
Video : Navneet Rana and Ravi Rana | नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या सुटकेसाठी मुलगी आरोहीची देवाकडे प्रार्थना#NavneetRana #RaviRana #MahaVikasAghadi #MumbaiPolice
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा : https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/Su138mYnMp
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 27, 2022
राणा दाम्पत्याला दिलासा आणि धक्का
खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याविरोधात कलम 153 (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात गुन्ह्यात राजद्रोहाचंही कलम टाकण्यात आलं होतं. ही कारवाई होत असनाचा सरकारी कामात अडथळा आल्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र हा गुन्हा रद्द करता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे. तसंच 353 अंतर्गत जो गुन्हा दाखल आहे. त्याबाबत कुठलीही कारवाई पोलिसांना करायची असेल तर त्यापूर्वी 72 तास आधी राणा दाम्पत्याला एक नोटीस द्यावी लागणार आहे. अशाप्रकारचा निकाल हायकोर्टानं परवा दिलाय.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राणा दाम्पत्याच्या वकिलांनी त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर अशी विनंती केली की, दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जेव्हा त्यांच्या जामिनावर सुनावणी होईल त्यावेळेला इथे जे त्यांच्याबद्दल जे ऑब्झर्वेशन्स नोंदवले गेले आहेत, ते विचारात घेतले जाऊ नयेत. त्यांची ही विनंती मान केली गेली आहे. माननीय उच्च न्यायालयाने आता असे आदेश दिले आहेत की, त्यांच्या जामिनावरील सुनावणी होईल तेव्हा ती मेरिट्सवर व्हावी. आमचे निष्कर्ष आहेत ते त्यांनी जामिनावरील अर्जावर विचारात घेऊ नयेत’.
इतर बातम्या :