Navneet Rana : राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी! जेल, बेल की जेलमध्येच घरचं जेवण? आज ठरणार

Navneet Rana Jail or Bail : या आधी वांद्रे कोर्टाने सरकारी वकील आणि खार पोलिसांना 27 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं आणि या प्रकरणावर 29 तारखेला सुनावणी ठेवली होती.

Navneet Rana : राणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी! जेल, बेल की जेलमध्येच घरचं जेवण? आज ठरणार
नवनीत राणा, रवी राणा यांना बेल की पुन्हा जेल?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 10:25 AM

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर (bail Application) आज सुनावणी पार पडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचं कल्म लावण्यात आलं. दरम्यान, राणा दाम्पत्याकडून मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होईल. या सुनावणीत राणा दाम्पत्याला बेल मिळणार की जेलमध्येच (Jail or Bail) राहावं लागणार, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयात लेखी युक्तीवाद स्वीकारल्यानंतर कोर्ट जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 26 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीनंतर याबाबतची माहिती दिली होती. फक्त जामीनच नव्हे, तर घराचं जेवण मिळावं, यासाठीही देखील राणा दाम्पत्यानं अर्ज केला होता. त्यावरही आजच्या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष सरकारी वकिलांकडून राणा दाम्पत्याला जामीन मिळू नये, यासाठीआज प्रयत्न होताना पाहायला मिळण्याची शक्यताय.

..म्हणून आज सुनावणी

नवनीत राणा आणि रवी राणा यांना वांद्रे कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर राणा यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलीये. राणा यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची मागणी रिजवान मर्चंट यांनी केली होती. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी विरोध केला होता. वांद्रे कोर्टात जामीनासाठी अर्ज केलेला असताना पुन्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याची गरज काय? असा सवाल करत सरकारी वकिलांनी याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना येत्या 29 तारखेपर्यंत आपलं म्हणणं सविस्तर मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज नेमकी या सगळ्यावर काय सुनावणी होते, हे पाहणं महत्त्वाचंय.

या आधी वांद्रे कोर्टाने सरकारी वकील आणि खार पोलिसांना 27 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं आणि या प्रकरणावर 29 तारखेला सुनावणी ठेवली होती. मात्र, राणा दाम्पत्याने सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, कोर्टाने खार पोलिसांना 29 तारखेपर्यंत आपलं लेखी म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राणा दाम्पत्याची कोठडी कायम राहणार की नाही, हे आजच्या सुनावणीतून स्पष्ट होईल

काय आहे प्रकरण?

शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतरही राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाण्यावर ठाम होत्या. मात्र अखेर मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर शिवसैनिकांनीही माघार घेतलेली. दरम्यान, त्याच दिवशी नवनीत राणा रवी राणा यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.

राणांची टीका

हनुमान चालीसा म्हणणं गुन्हा आहे का, असा सवाल उपस्थित करत आला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवरही राणा दाम्पत्यानं जोरदार टीका केली होती.

राजकारण तापलं

नवनीत राणा आणि पोलिस यांच्यामधील बाचाबाचीचा व्हिडीओ, त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणांना दिलेल्या वागणुकीवरुन सुरु झालेला वाद, अशा अनेक बाबींमुळे नवनीत राणा आणि रवी राणा चर्चेत राहिले आहेत. विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांना चुकीची वागणूक दिली गेल्याचा आरोप केला होता. त्याला संजय पांडे यांनी व्हिडीओ ट्वीट करत उत्तरही दिलं होतं. दरम्यान, तूर्तासतरी राणा दाम्पत्याला कोर्टानं कोणताही दिलाला दिलेला नाही. त्यामुळे जवळपास गेला संपूर्ण आठवडा राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागली. आता आज होणाऱ्या सुनावणीमध्ये राणा दाम्पत्याला कोर्ट दिलासा देतं का, हे पाहणं महत्त्वाचंय.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....