राऊत रोज बडबडतात, ‘चोर की दाढ़ी में चूगार’ – नवनीत राणा
आत्तापर्यंत मुंबईत झालेलं काँग्रेसचं आंदोलन असेल किंवा भाजपचं आंदोलन असेल. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण किती तापलंय यांचा अनेकांना अंदाज आला असेल. किरीट सोमय्या रोज भाजपच्या अनेक नेत्यांवरती टिका करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी असंही म्हणत आहेत.
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) रोज सकाळी पत्रकार परिषद घेत असल्याने त्यांना नवनीत राणा (navneet rana) यांनी रोज पोपटासारखे बोलत असल्याचे म्हणत टीका केली आहे. तसेच त्यांनी काहीतरी घोटाळा केल्या असल्याने ते इतकी बडबड करीत असल्याचे राणा म्हणाल्या आहेत. सकाळी किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यापासून राजकीय वातावरण गरम आहे. त्यातचं संजय राऊत भाजपच्या काही नेत्यांची नावं जाहीर करणार असल्याने भाजप सुध्दा त्यांच्या पत्रकार परिषदेवर लक्ष ठेऊन असेल. किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू असून रोज नवं प्रकरण उघडकीस येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जर कोणताही घाोटाळा केला नसेल त्यांनी घाबरण्याचं काहीचं कारण नाही असं म्हणटलं त्यांनी
फक्त भाजपविरोधी बोलणा-यांची चौकशी
आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, तुम्हाला तीनच्यानंतर लक्षात येईल की, आम्ही काय करणार आहोत. इतक्या वर्षात भाजप आपली सत्ता हातात असल्यामुळे त्यांच्या कारभारा विरोधात जो कोणी बोलेले त्याला अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्या लोकांच्या आत्तापर्यंत चौकशी झाली ही मनातून द्वेश ठेऊन झाली. कारण त्यांनी भाजपच्या विरोधात ब्र जरी काढला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येते. भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई झालेली नाही. पण ज्या राज्यात भाजपाला सत्ता नाही अशा राज्यात तिथल्या नेत्यांवर कारवाई झाल्याचे पाहायला मिळते असं का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टिका देखील केली आहे. संजय राऊत यांनी जर काहीचं केलेलं नाही. तर मग घाबरायचं कारण काय असं भाजपच्या नेत्या नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच ‘चोर की दाढ़ी में चूगार’ असंही संजय राऊतांना म्हणाल्या आहेत.
पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष
आत्तापर्यंत मुंबईत झालेलं काँग्रेसचं आंदोलन असेल किंवा भाजपचं आंदोलन असेल. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण किती तापलंय यांचा अनेकांना अंदाज आला असेल. किरीट सोमय्या रोज भाजपच्या अनेक नेत्यांवरती टिका करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी करावी असंही म्हणत आहेत. पण महाविकास आघाडीकडून कोणतंच उत्तर मिळत नसल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी सकाळी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सकाळी तक्रार दाखल केली आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोण त्रास देतंय. त्यांची नाव जाहीर करणार असल्याने अनेकांचं लक्ष संजय राऊत यांच्याकडे लागलं आहे.