चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा; नवाब मलिकांचा इशारा

वक्फ बोर्डाचे काम पारदर्शीपणे सुरू असून, बोर्डाच्या कार्यालयावर ईडीचे छापे पडले नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच छापे पडल्याची अफवा पसरू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा; नवाब मलिकांचा इशारा
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 11:54 AM

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण 7 ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त होते. दरम्यान नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. कालपासून वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडल्याच्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. परंतु  वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाहीत. जी छापेमारी सुरू आहे ती ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट वर आहे. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शीपणे सुरू असून, अफवा पसरवणे बंद करा असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी ‘चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा’ म्हणत मलिक यांनी भाजपाला देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, कालपासून वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडल्याच्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र  वक्फ बोर्डाच्या कुठल्याही कार्यालयावर छापे पडले नाहीत. आमचे काम पादर्शीपणे सुरू आहे. अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मी ईडीला कुठल्याही चौकशीत सहकार्य करायला तयार आहे. याउलट भाजपाच्याच एका नेत्याने मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 विलगिकरण अशक्य

त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे विलगिकरणासाठी आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाचे विलगिकरण अशक्य आहे. एसटी कर्मचारी हे शासकीय कर्मचारी होऊ शकत नाहीत. त्यांच्या इतर मागण्या मान्य करू, पंरतु विलगिकरणाची मागणी मान्य न होण्यासारखी असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत तिला देण्यात आलेले पुरस्कार वापस घ्यावेतस तिला अटक करावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

संबंधित बातम्या 

कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या; लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी, संजय राऊत भडकले

महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार; मुंबईत येताच नड्डांचा हुंकार

पिकांचे भाव माहित नाहीत; गांजा किती रुपयांना मिळतो हे बरोबर ठावूक असते, विखेंचा मलिकांवर निशाणा

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.