Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nawab Malik : नवाब मलिकांचा एनसीबीवर पुन्हा गंभीर आरोप, अधिकारी आणि पंचांमधील कथित ऑडिओ क्लिपही जाहीर

मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप मलिक यांनी जाहीर केलीय.

Nawab Malik : नवाब मलिकांचा एनसीबीवर पुन्हा गंभीर आरोप, अधिकारी आणि पंचांमधील कथित ऑडिओ क्लिपही जाहीर
नवाब मलिक, समीर वानखेडे
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 4:25 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर (NCB Officers) गंभीर आरोप केलाय. मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio Clip) मलिक यांनी जाहीर केलीय. याद्वारे मलिकांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय.

दरम्यान एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे त्या साक्षीदाराला स्वाक्षरी करण्याची सूचना देत असल्याचेही संभाषण या ऑडिओ क्लीपमध्ये असल्याने एनसीबी कशापद्धतीने फर्जीवाडा करत आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

‘वानखेडेंना मुदतवाढ देण्यासाठी भाजप नेता प्रयत्नशील’

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला आहे. असं असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केलाय. तसंच समीर वानखेडे यांना मुदतवाढ द्या. त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

‘समीर खान विरोधात अपील दाखल करुन प्रसिद्धीचा खेळ सुरु’

मुख्य आरोपी करन सजलानी आहे. याशिवाय सहा आरोपी या प्रकरणात आहेत. करन सजलानी याच्या ताब्यातून माल एनसीबीने ताब्यात घेतला. त्याविरोधात अपील नाही. फर्नीचरवालाच्या विरोधात अपील नाही. मात्र समीर खानच्या विरोधात अपील दाखल करुन प्रसिद्धीचा खेळ सुरु आहे. आम्ही न्यायालयीन लढाई न्यायालयात लढू. आम्ही हे प्रकरण क्वॅश करण्यासाठी हायकोर्टात दाखल केले आहे. हायकोर्टात कागदपत्रात असल्याचे सांगितले जात आहे की, 84 किलो सोकॉल्ड पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये आले आहे.

..पण मी घाबरणार नाही- मलिक

याच एजन्सीने लोअर कोर्टात 1 किलो 101 ग्रॅम असल्याचे लिहून दिले आहे. परंतु न्यायाधीशांनी मानले नाही, फक्त 60 ग्रॅम प्रकरण होते. फर्जीवाड्याची मर्यादा एनसीबीने पार केली आहे. जर एनसीबी प्रोफेशनल एजन्सी आहे तर एकट्या समीर खानच्याविरोधातच का? हे त्यांना सांगावे लागेल असेही नवाब मलिक म्हणाले. मला घाबरवण्यासाठीच असा प्रकार एनसीबी करत असेल तर मी घाबरणार नाही. जे नियम तोडून काम करत आहेत त्यांच्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार असल्याचे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘नवीन फर्जीवाडा उघड करायला बंदी नाही’

एनसीबी अधिकार्‍याच्या घरातील लोक कोर्टात गेले. माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मला कोर्टाने बोलण्यापासून रोखले. कोर्टाचा आदर करत त्याच ऑर्डरमध्ये कोर्टाला आमच्याकडून स्पष्टपणे विचारण्यात आले की एनसीबी किंवा केंद्रीय एजन्सी काही चुकीचं करत असेल तर मला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नवीन फर्जीवाडा उघड करायला बंदी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता हे प्रकरण पंचनामा बदलण्याचे आहे. याप्रकरणात एनसीबीचे डीजी किरणबाबू व समीर वानखेडे यांच्यावर काय कारवाई करणार आहे, असा सवालही मलिक यांनी यावेळी केला.

‘स्मगलरच्यावतीने पीआर एजन्सीचा वापर’

स्मगलरच्यावतीने पीआर एजन्सीचा वापर केला जात आहे. ड्रग्ज पेडलर लाखो रुपये पीआर एजन्सीवर खर्च करून बातम्या पेरण्याचे काम करत आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केलाय. न्यायाधीश जोगळे यांनी समीर खानला जामीन देताना आपल्या ऑर्डरमध्ये फर्जीवाडा करुन लोकांना फसवण्यात आले आहे असे म्हटले आहे. असे असताना समीर वानखेडेकडून पूर्वीचा पंचनामा बदलण्याचा प्रकार होत आहे. एनसीबीचाच अधिकारी आता अडचणीत येत असल्याचे समोर येताच पंचनामा बदलला जात आहे, असा आरोपही मलिकांनी केलाय.

एनसीबीचा फर्जीवाडा कोर्टासुध्दा आणि जनतेसमोर उघड करणार आहे. ज्याप्रकारे फर्जीवाडा झाला आहे तो मानहानीच्या केसमध्ये सिध्द करेन आणि येणाऱ्या काळात एनसीबीचे अजून फर्जीवाडे समोर आणणार असल्याचा इशाराही मलिकांनी यावेळी दिलाय.

इतर बातम्या :

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा, सरकारच्या ताफ्यातील वाहनं इलेक्ट्रीक असणार

Sulli Deal | मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, ‘सुल्ली डील’ नेमका प्रकार काय ?

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.