New delhi : 9, 10 जूनला राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार, काँग्रेससह विरोधी पक्षांना एकत्र आणणार

कोविड काळात बेरोजगारी वाढली, व्यापार ठप्प झाला, लोकांना नुकसान झालं, महागाई वाढली यावरून आगामी काळात आंदोलन करणार असल्याचंही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

New delhi : 9, 10 जूनला राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार, काँग्रेससह विरोधी पक्षांना एकत्र आणणार
nawab malik
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 6:29 PM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. त्यात विविध विषयांवर चर्चा झाली आहे. आगामी 5 राज्यांच्या निवडणुका, पक्षाची  संघटनात्मक बांधणी, ओबीसी आरक्षण अशा विविध मुद्यावर धोरण ठरवण्याबाबत बैठक होती. आगामी काळात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जाणार आहेत. कोविड काळात बेरोजगारी वाढली, व्यापार ठप्प झाला, लोकांना नुकसान झालं, महागाई वाढली यावरून आगामी काळात आंदोलन करणार असल्याचंही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

जूनमध्ये दिल्लात राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन

राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, 10 जूनला राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. देशात भाजप भीतीचे वातावरण निर्माण करत आहे , लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे, देशात महागाई, धार्मिक भीती पसरवली जातेय, याबाबत देशात पर्याय तयार केला जाणार, भाजपविरोधात सगळ्यांना एकत्र करून ताकद उभारली जाणार, लोकांना पर्याय हवा आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

5 राज्यांच्या निवडणूक बाबत चर्चा

राष्ट्रवादीच्या या बैठकीत 5 राज्यांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेशाबाबत अखिलेश यादव यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. तसेच गोवा, मणिपूरबाबतही चर्चा झाली असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीही जोमाने उतरणार आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत संसदेत कायदा आणावा

ओबीसी आरक्षणासाठी आम्ही लढाई केली, पण काही लोक, ज्यांना भाजपचे समर्थन आहे, ते कोर्टात गेले आणि देशात इतर राज्यात असलेला कायदा रद्द झाला अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिली आहे. आम्ही मागणी केली केंद्राने याबाबत संशोधन करावं, आरक्षणाचा कायदा संसदेत आणावा असंही मलिक म्हणाले आहेत.

कृषी कायदे रद्द झाल्याबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन

वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनानंतर अखेर तिन्ही कृषी कायदे सरकारला रद्द करावे लागले, त्यासाठी शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. तर राष्ट्रवादी इथून पुढे कायम शेतकऱ्यांसोबत असेल असंही त्यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut: एकच फ्रंट असेल तरच पर्याय देऊ शकतो, नेतृत्वाचं नंतर ठरेल; संजय राऊतांचे राहुल गांधींसोबत पाऊण तास खलबते

Video: चक्क मांजरीला रस्ता ओलांडून देण्यासाठी गाड्या थांबवल्या, वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल!

अनिल देशमुखांच्या पत्नीला दिलासा, खासगी सचिव पलांडे आणि शिंदेंना मात्र जामीन नाहीच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.