देवेंद्र फडणवीसांनी मलिकांविरोधात ‘बॉम्ब’ फोडला! मलिकांचा मुलगा म्हणतो ‘सर्व व्यवहार कायदेशीर’!

शाह वली खान अंजरवर्ल्डसाठी काम करतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. रेडी रेकनरच्या दराने ही जागा विकत घेतली. इथे तिनशे भाडेकरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहतात. काही घरं अनधिकृतही आहेत. पण आम्ही त्यांना त्रास देत नाहीत, असं फराज मलिक यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीसांनी मलिकांविरोधात 'बॉम्ब' फोडला! मलिकांचा मुलगा म्हणतो 'सर्व व्यवहार कायदेशीर'!
फराज मलिक, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 3:14 PM

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून कवडीमोल दरात जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. हा व्यवहार 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान आणि समील पटेल यांच्याकजून फराज मलिक यांनी ही जमीन खरेदी केल्याचे पुरावेच फडणवीसांनी दाखवले आहेत. त्याबाबत विचारलं असता, नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचं सांगत फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत. (Nawab Malik’s son Faraz Malik’s explanation on Devendra Fadnavis’ allegations)

देवेंद्र फडणवीस दावा करतात की ही जागा आम्ही सलीम पटेलकडून विकत घेतली. तर 2005 साली ते इथे 400 लोकांकडून भाडे वसूल करत होते. आमच्याकडे सगळे जुने पुरावे आहेत. सलीम पटेल हे आमचे त्या काळातील जागामालक होते. हे सगळे साल 2007 ला दोषी आढळून आले आहेत. शाह वली खान अंजरवर्ल्डसाठी काम करतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. रेडी रेकनरच्या दराने ही जागा विकत घेतली. इथे तिनशे भाडेकरु आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहतात. काही घरं अनधिकृतही आहेत. पण आम्ही त्यांना त्रास देत नाहीत, असं फराज मलिक यांनी म्हटलंय.

फडणवीसांचे आरोप चुकीचे- फराज मलिक

देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे आरोप करणं. ग्रीन झोनमध्ये हे नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. 70 टक्क्यात आरक्षण नाही. 30 टक्क्यात आरक्षण आहे. जे अंडरवर्ल्डबाबत आरोप होतात ते चुकीचे आहेत. खोटे आहेत. आता केंद्रीय तपास यंत्रणा येतील, तपास करतील. त्यांना आम्ही सगळे पुरावे दाखवू, सगळी कागदपत्र लिगल आहेत, असा दावा फराज मलिक यांनी केलाय.

नवाब मलिकांचे स्पष्टीकरण काय?

दरम्यान, गोवावाला कंपाऊंडमध्ये आम्ही किरायाने राहायला होतो. तेव्हा जागा मालकिनीने आम्हाला जमीन विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शाह वली खानचे वडील तिथे वॉचमन म्हणून काम पाहत होते. तिथे शाह वली खानचं एक घरही होतं. त्याने तिथे 300 मीटर जागेवर कब्जा केला होता. आम्हाला रजिस्ट्रीला गेल्यावर ही गोष्ट माहिती पडली. ती जागा घेण्यासाठी आम्ही शाह वली खानला पैसे दिले. कुठल्याही अंडरवर्ल्डच्या माणसाकडून आम्ही जमीन खरेदी केली नाही, असं स्पष्टीकरण मलिक यांनी दिलं आहे. दरम्यान, फडणवीस माहितीगार कच्चे खिलाडी आहेत. त्यांनी आमच्याकडून माहिती घ्यायला हवी होती. मी त्यांना कागद दिले असते, असा खोचक टोलाही मलिक यांनी लगावलाय.

इतर बातम्या :

‘फडणवीसांचा बॉम्ब तर फुटला नाही, पण आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार’, फडणवीसांच्या आरोपानंतर मलिकांचा थेट इशारा

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

Nawab Malik’s son Faraz Malik’s explanation on Devendra Fadnavis’ allegations

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.