आरंभ है प्रचंड! लिहून घ्या, चोरलेला बाण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, हे आमदार उद्धव ठाकरेंसोबतच!
जसा केंद्र सरकारच्या दबावाखाली केंद्रीय यंत्रणा काम करतात. तसं निवडणूक आयोग काम करतांय का? असा सवाल आमदाराने केला आहे.
नागपूरः निवडणूक आयोगाने (Election Commission) काहीही निकाल दिला तरी शिवसेना (Shivsena) ही शिवसैनिकांची वाघाचीच असणार. आम्ही नव्याने लढाईला तयार आहोत, अशी भूमिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मांडली आहे. तर महाविकास आगाडीतील प्रत्येक घटकपक्षही उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभा आहे. मविआतील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंसोबत आम्ही ताकतीने उभे राहू, असं आश्वासन दिलंय. याच मालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. मिटकरी यांनी काल माध्यमांसमोर प्रतिक्रिया तर दिलीच. पण ट्विटच्या माध्यमातून लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, दाखवून दिलंय….
मिटकरी यांचं ट्विट काय?
अमोल मिटकरी यांनी आरंभ है प्रचंड, बोले मस्तकोंके झुंड, आज जंग की घडी की तुम गुहार दो… या गाण्याच्या ओळी वापरून शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केलाय. आता तर खऱ्या लढाईला सुरुवात झाली आहे. या महाराष्ट्र द्रोह्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा मिटकरी यांनी दिलाय.
“आरंभ है प्रचंड बोले मस्तकोंके झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो l आण बाण शान या की जान का हो दान आज एक “धनुष के बाण” पे उतार दो ll खऱ्या लढाईला सुरुवात झाली.. महाराष्ट्र द्रोह्याना जागा दाखविण्याची वेळ आली ll #जयमहाराष्ट्र pic.twitter.com/OLsWg1rnVP
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 17, 2023
लिहून घ्या, चोरलेला बाण…
अमोल मिटकरी यांनी काल माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ निवडणूक आयोगाचा निर्णय आहे… याला मी ऐतिहासिक निर्णय म्हणत नाही. निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे. धनुष्यबाण हा बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांच्याबरोबर होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आजही शिवसैनिक आज विचलित झाले नाहीत. आयोगाच्या या निर्णयाने तीळमात्रही फरक पडणार नाही.याही पेक्षा ताकतीने शिवसेना उभी राहणार. निवडणूक आयोग मॅनेज झालेला आहे. जसा केंद्र सरकारच्या दबावाखाली केंद्रीय यंत्रणा काम करतात. तसं निवडणूक आयोग काम करतांय का? मुंबई महापालिला निवडणुकीवर तीळमात्रही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे यांचा भगवा मुंबई महापालिकेवर फडणकणार आहे.
महाविकास आघाडी कायमस्वरुपी उद्धवजींच्या सोबत होती. आजही आहे आणि भविष्यातही राहणार. आजच्या निकालानंतर मविआचा प्रत्येक घटकपक्ष आणखी ताकतीने उद्धव ठाकरेंसोबत उभा राहिल. लिहून घ्या धनुष्यबाण जरी त्यांनी चोरून घेतला असेल तो बाण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही…
जनता उद्धव ठाकरेंकडून?
अमोल मिटकरी यांनी आणखी एक ट्विट केलंय. ज्यात काही माध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणांची आकडेवारी दिसतेय. निवडणूक आयोगाचा निर्णय तुम्हाला मान्या आहे का, यावर बहुतांश लोकांनी नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असेही सर्वाधिक लोकांनी सांगितलंय.