राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काल पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करुन लढणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा येतात. त्यातील 10 जागा काल, तर 5 जागा जाहीर करण्यात आल्या. विशेष […]

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काल पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेससोबत आघाडी करुन लढणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा येतात. त्यातील 10 जागा काल, तर 5 जागा जाहीर करण्यात आल्या.

विशेष म्हणजे, मावळमधून नातू पार्थ पवार यांची उमेदवारी स्वत: शरद पवार यांनीच जाहीर केली. तसेच, दुसऱ्या यादीतील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिरुरमधून विलास लांडे यांचा पत्त कट झाला आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी :

  • नाशिक – समीर भुजबळ
  • मावळ – पार्थ पवार
  • शिरुर – अमोल कोल्हे
  • दिंडोरी – धनराज महाले
  • बीड – बजरंग सोनवणे

शिरुरमधून विलास लांडेंचा पत्ता कट

शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने तिकीट जाहीर केल्याने विलास लांडे यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलास लांडे यांना काम करण्यास सांगितलं आणि त्यानंतर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरवात केली. पण अचानक अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर आता अमोल कोल्हे यांना उमेदवारीही जाहीर झाली. अमोल कोल्हे यांचे नाव आल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार थंड पडल्याचं चित्र शिरूर मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत होतं.

दिंडोरीतूनही नवख्या उमेदवाराला उमेदवारी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाले यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये केला होता. धनराज महाले हे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र असुन, 2009 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते.

राष्ट्रवादीची पहिली यादी :

  • रायगड – सुनील तटकरे
  • बारामती – सुप्रिया सुळे
  • सातारा – उदयनराजे भोसले
  • बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
  • जळगाव – गुलाबराव देवकर
  • मुंबई उत्तर-पूर्व  – संजय दीना पाटील
  • कोल्हापूर – धनंजय महाडिक
  • परभणी – राजेश  विटेकर
  • ठाणे – आनंद परांजपे
  • कल्याण -बाबाजी पाटील
  • हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा
  • लक्षद्विप – मोहम्मद फैजल

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.