महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला; काय घडतंय पडद्यामागे?

छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला; काय घडतंय पडद्यामागे?
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 11:11 AM

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार आहे. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट होणार आहे. या भेटीसाठी छगन भुजबळ हे सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे महायुतीत छगन भुजबळ हे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटण्यासाठी गेल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

महायुतीला धक्का बसेल, असं छगन भुजबळ काहीही करणार नाहीत

“सध्या अनेक सामाजिक घडामोडी घडत आहे. त्यामुळे विकासात्मक, सामाजिक अशा चर्चा असतात. ज्यात राज्यात काही राजकारण सुरु असते, त्यात कधी ना कधी तरी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष भेटत असतात. त्यामुळे भुजबळ आणि पवार ही भेट कशाबद्दल आहे, हे ते या भेटीनंतर सांगतील. छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास मला माहिती आहे, त्यामुळे ते महायुतीला धक्का बसेल, असा कोणताही निर्णय घेणार नाही, याची मला खात्री आहे. त्या उलट ते महायुती कशी एकत्र राहिल याचा प्रयत्न नेहमी करतात. शरद पवारांना मी देखील अनकेदा भेटलो आहे, त्यामुळे काही बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे या भेटीत काहीही राजकीय घडामोड नाही”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

“मला या भेटीबद्दल काहीही सांगता येणार नाही. पण भुजबळांचे राजकारण असेच सनसनाटी राहिलेले आहे. आता ही भेट आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आहे की आणखी इतर गोष्टींबदद्ल, याची मला कल्पना नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाल्यानतंरच याबद्दल समजेल”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

“भुजबळ हे अचानक शरद पवारांच्या भेटीला जात असल्याने त्याला निश्चित एखादे राजकीय कारण असावे. भुजबळ हे सहजासहजी कोणाला भेटायला जाऊन फक्त चहा पाणी करुन येतील असा काही भाग नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काही राजकीय खदखद असेल, त्यांना काही भूमिका मांडायची असेल, तर त्या अनुषंगाने ही भेट असू शकते. त्यामुळे या भेटीनंतर भुजबळ काय बोलतात, यानंतर यामागील राजकारण समजून शकेल. पण आता त्याच्याबद्दलचा अंदाज बांधणं कठीण आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.