Ajit Pawar : ‘मी तर आव्हान दिलय, की…’, काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar : अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबरोबर त्यांनी अन्य राजकीय मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीला महायुतीला मोठा फटका बसला. अजित पवार यांच्या पक्षाचा फक्त एक खासदार निवडून आला.
पुण्यात आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु झाली आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल ते बोलले. “महिलांमध्ये मला उत्साह दिसतोय. काल पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांच्या खात्यात डिबीटीद्वारे पैसे जमा झाले. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, त्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद, समाधान दिसलं” असं अजित पवार म्हणाले.
“गरीब घरातील महिला, कष्टकरी महिला त्यांच्यासाठी चांगल्या योजना आणल्या. शेतकऱ्यांना वीजमाफी, तीन गॅस सिलिंडर वर्षाला देण असेल, युवतींना प्रशिक्षण देण्याच काम असेल, दुधाला दर वाढवून देणयात आला अशा अनेक गोष्टी समाजासाठी करतोय. गरीब घटकाला सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या वर्गांकरता आम्ही मदत करतोय. त्यामध्ये मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्यांच योगदान आहे” असं अजित पवार म्हणाले.
‘मी नाव का बदलू’
“महायुतीमध्ये आमच्यात कुठलाही वाद नाही. एकोप्याने महायुती म्हणून आम्ही सरकार चालवतोय. मागे माझी प्रचंड बदनामी करण्यात आली. वेशभूषा, नाव बदलून जातो म्हणून. मी तर आव्हान दिलय, मी कुठे नाव बदलून गेलो. एवढ आई-वडिलांनी मला सुंदर नाव दिलय. त्याचा मला अभिमान आहे. मी नाव का बदलू?” असा सवला अजित पवाकरांनी केला.
‘आम्ही कामाची माणसं’
“आता मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही एकत्र जळगावला गेलो होतो. एकत्र सभा घेतली. एकत्र परत आलो. विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिलेला नाही. बदनामी करतायत, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरु आहे, त्याबद्दल मला बोलायच नाहीय” असं अजित पवार म्हणाले. “माझं म्हणण आहे की आम्ही कामाची माणसं आहोत. विकास साधणारी माणसं आहोत. त्यापेक्षा आरोप-प्रत्यारोपात रस नाही” असं अजित पवार म्हणाले.