पडळकरांना दुचाकीवरुन फिरवणं महागात, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी

गोपीचंद पडळकर यांना दुचाकीवर घेऊन फिरणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला चांगलेच महागात पडले (NCP corporator Expulsion after bike ride Gopichand Padalkar) आहे.

पडळकरांना दुचाकीवरुन फिरवणं महागात, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 10:07 PM

सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना दुचाकीवर फिरवणं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमू एडके यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. (NCP corporator Expulsion from Party after bike ride with Gopichand Padalkar )

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पडळकरांविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. पडळकरांना राज्यात फिरु देणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात थेट पडळकरांना दुचाकीवरुन फिरवलं.

जत नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके यांनी स्वत:च्या दुचाकीवर पडळकरांना बसवून, शहरभर फिरवून, राष्ट्रवादीला अक्षरश: खिजवलं. याशिवाय गोपीचंद पडळकर यांचा हारतुरे घालून सत्कारही केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याच सांगली जिल्ह्यात हा प्रकार घडला

या प्रकरानंतर जत शहरात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. या प्रकारानंतर टिमू एडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते नॉट रिचेबल होते.

हेही वाचा – कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया 

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर पडळकरांविरोधात आंदोलन केलं. या वक्तव्याच्या निषेधार्थ ठिक-ठिकाणी आमदार पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले.

शरद पवार पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले?

विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर दिली.

“पडळकरांना मी जास्त महत्त्व देत नाही. बारामतीत लोकसभा निवडणूक लढली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, विधानसभेची निवडणूक लढलं, तिथेही डिपॉझिट जप्त झालं. मग सांगलीत लोकसभा लढवली, तिथेही काही चाललं नाही. त्यामुळे काय बोलायचं” असं पवार म्हणाले. (NCP corporator Expulsion from Party after bike ride with Gopichand Padalkar)

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने स्वत:च्या पक्षालाच खिजवलं, पडळकरांना बाईकवरुन शहरभर फिरवलं!

लायकी पाहून बोलावं, सूर्यावर थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते : अजित पवार 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.