महाराष्ट्रात काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा जास्त मतं, जागा मिळाली फक्त एक
मुंबई : महाराष्ट्रात या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ झालाय. केवळ एक जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलंय. विशेष म्हणजे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला कमी मतं मिळालेली असतानाही 04 जागा निवडून आल्या. काँग्रेसचे काही उमेदवार अत्यंत कमी फरकाने हरले. त्यामुळे मतं मिळालेली असतानाही जिंकण्यात अपयश आलं. तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे देखील अत्यंत […]
मुंबई : महाराष्ट्रात या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ झालाय. केवळ एक जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलंय. विशेष म्हणजे काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला कमी मतं मिळालेली असतानाही 04 जागा निवडून आल्या. काँग्रेसचे काही उमेदवार अत्यंत कमी फरकाने हरले. त्यामुळे मतं मिळालेली असतानाही जिंकण्यात अपयश आलं. तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे देखील अत्यंत कमी फरकाने निवडून आले. त्यामुळे काँग्रेसच्या तुलनेत मित्रपक्षानेच जास्त जागा जिंकल्या.
महाराष्ट्रातील पक्षनिहाय मतं
भाजप – 14912139 (27.59%)
शिवसेना – 12589064 (23.30%)
काँग्रेस – 8792237 (16.30%)
राष्ट्रवादी – 8387363 (15.50%)
महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल
भाजप – 23
शिवसेना – 18
काँग्रेस – 01
राष्ट्रवादी – 04
एमआयएम – 01
इतर – 01
कमी फरकाने जिंकलेले महाराष्ट्रातील उमेदवार
औरंगाबाद, इम्तियाज जलील – 4492 मतांनी विजयी
चंद्रपूर, बाळू धानोरकर – 44763 मतांनी विजयी
पालघर, राजेंद्र गावित – 88883 मतांनी विजयी
परभणी, संजय जाधव – 42199 मतांनी विजयी
रायगड, सुनील तटकरे – 31438 मतांनी विजयी
शिरुर, अमोल कोल्हे – 58483 मतांनी विजयी
नवनीत कौर राणा – 36951 मतांनी विजयी
दोन लाखांपेक्षा जास्त फरकाने जिंकून आलेले खासदार
अहमदनगर, सुजय विखे – 281474 मतांनी विजयी
अकोला, संजय धोत्रे – 275596 मतांनी विजयी
धुळे, सुभाष भामरे – 229243 मतांनी विजयी
हिंगोली, हेमंत पाटील – 277856 मतांनी विजयी
जळगाव, उन्मेश पाटील – 411617 मतांनी विजयी
जालना, रावसाहेब दानवे – 332815 मतांनी विजयी
कल्याण, श्रीकांत शिंदे – 344343 मतांनी विजयी
कोल्हापूर, संजय मंडलिक – 270568 मतांनी विजयी
लातूर, सुधाकर शृंगारे – 289111 मतांनी विजयी
मावळ, श्रीरंग बारणे – 215913 मतांनी विजयी
उत्तर मुंबई, गोपाळ शेट्टी – 465247 मतांनी विजयी
ईशान्य मुंबई, मनोज कोटक – 226486 मतांनी विजयी
उत्तर पश्चिम मुंबई, गजानन कीर्तीकर – 260328 मतांनी विजयी
नागपूर, नितीन गडकरी – 216009 मतांनी विजयी
नाशिक, हेमंत गोडसे – 292204 मतांनी विजयी
पुणे, गिरीष बापट – 324628 मतांनी विजयी
रावेर, रक्षा खडसे – 335882 मतांनी विजयी
ठाणे, राजन विचारे – 412145 मतांनी विजयी