EXCLUSIVE : मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही, जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत

राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसमध्ये विलीनिकरणाच्या वावड्या 22 वर्षापासून उठतात. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतद्रष्ट या वावड्या उठवतात, असं जयंत पाटील (NCP Jayant Patil) म्हणाले.

EXCLUSIVE : मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही, जयंत पाटील यांची रोखठोक मुलाखत
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 1:58 PM

अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जूनला 22 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. 22 वर्षांचा काळ हा चढउतारांचा होता, महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची नेहमीच महत्वाची भुमिका होती. 2024 पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असं विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. (NCP Jayant Patil Exclusive interview on NCP foundation day talks on Sharad Pawar, Maharashtra chief minister post, maha vikas aaghadi, shiv sena, BJP )

शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्या भागात प्रभावी होते म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटले गेले, मात्र त्यातूनच आर आर पाटील यांच्यासारखे नेते पुढे आले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही

राष्ट्रवादी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची आस्था असणं साहजिक आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही, जे पक्ष अधिक चांगला झाला, जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील. आज पहिलं काम आहे पक्ष बलवान करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे”

दुसऱ्या पक्षातील नेतेही शरद पवारांच्या प्रेमात

शरद पवारांच्या कार्यपद्धतीकडे सर्वच नेते आदराने बघतात, दुसऱ्या पक्षातील नेते सुद्धा शरद पवारांकडे आदराने बघतात. अनेक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगतात, मात्र कोरोनामुळे अडचणी आल्या आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवार हे केंद्रात दहा वर्ष कृषीमंत्री होते. कृषीमंत्री कसा असावा आणि तो काय काय करु शकतो हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का?

देशात फार कमी लोक आहेत ज्यांना देश चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्यापैकी शरद पवार आहेत. यूपीएतील इतर पक्ष काय विचार करतात हे माहित नाही, मात्र त्यांचा कार्यकर्ता या नात्याने माझी हीच इच्छा आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

तीन पक्षांचं सरकार राहावं

आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल, मात्र आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे, अशी कमेंट त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

सोडून गेलेले हळूहळू परत येतील

भाजपाने अडचणी केल्या म्हणून काही लोक राष्ट्रवादी सोडून गेले, काही दबावापोटी कुणी पक्ष सोडला असेल त्यांनी पक्षात यायला हरकत नाही. आम्हाला बेरजेचे राजकारण करायचे आहे, सोडून गेलेल्याविषयी आम्हाला आकस नाही. हळूहळू सर्वच नेते परत येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसमध्ये विलीनिकरणाच्या वावड्या 22 वर्षापासून उठतात. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतद्रष्ट या वावड्या उठवतात. तसंच पवार साहेबानंतर कोण हे नाव घेऊन पक्षात वितुष्ट निर्माण करायची गरज नाही, असंही ते म्हणाले.

मोदी – ठाकरे भेट

राजकारण करणाऱ्यांनी वैयक्तिक भेटीगाठी करु नये ही अपेक्षा चुकीची आहे. मात्र कुणाला कुठलाही निर्णय घेताना, बदलताना संपूर्ण समाजाला विश्वासात घ्यावे लागते, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीवर दिली.

कॉंग्रेसची स्वबळावरची भाषा

जबाबदारी असते त्यावेळी संयमाने बोलावे लागते, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास टिकावा म्हणून कदाचित ते बोलत असावे. एक सरकारमध्ये असताना अॅडव्हान्समध्ये भाष्य करणं मला योग्य वाटत ना, असं भाष्य त्यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेवर केलं.

अंतर्गत कलह मी मॅनेज करत नाही, मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की तो बाहेर येतो. मी सरळ वागतो, असं जयंत पाटील म्हणाले.

VIDEO : जयंत पाटील EXCLUSIVE 

(NCP Jayant Patil Exclusive interview on NCP foundation day talks on Sharad Pawar, Maharashtra chief minister post, maha vikas aaghadi, shiv sena, BJP )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.