Baramati Loksabha Voting : ‘अजित पवारांनी आमच्या 86 वर्षाच्या आईला…’, काय म्हणाले श्रीनिवास पवार?

Ajit Pawar : अजित पवार यांनी 'मेरी माँ मेरे साथ हैं!' असं म्हटलं. त्यांच्या या डायलॉगची सर्वत्र चर्चा आहे. त्यांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'दीवार' सिनेमाशी जोडला जात आहे. बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी काटे की टक्कर होत आहे. पवार विरुद्ध पवार ही प्रतिष्ठेची लढाई इथे रंगली आहे.

Baramati Loksabha Voting : 'अजित पवारांनी आमच्या 86 वर्षाच्या आईला...', काय म्हणाले श्रीनिवास पवार?
बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात यावेळी सगळे रंग पहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोप, भावनिक आवाहन, अश्रू, विकासाचे मुद्दे हे सगळं यावेळी दिसलं.
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 11:31 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. अजितदादा मतदानाला आले, त्यावेळी त्यांची आई आणि पत्नीसोबत होती. मतदानानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना अजित पवार यांनी ‘मेरी माँ मेरे साथ हैं!’ असं म्हटलं. त्यांच्या या डायलॉगची सर्वत्र चर्चा आहे. त्यांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाशी जोडला जात आहे. “कुठलीही निवडणूक मी महत्त्वाचीच मानतो. आमचं काम पाहून लोक आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वास आहे” असं अजित पवार म्हणाले.

कुटुंबियांचा सपोर्ट नाही असं म्हटलं जात होतं, पण तुमची आई सोबत होती, त्यावर अजित पवार म्हणाले की, “पवार कुटुंबात सगळ्यात मोठी माझी आई आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. बाकीच्यांचा काय विचार करताय ‘मेरी माँ मेरे साथ हैं!” तुमच्या भावाला तुम्हाला मिशी काढलेलं बघायचय, त्यावर अजित पवार म्हणाले की, “त्याने 10 वर्षापूर्वी मिशी काढली. तो आता माझी वाट बघतोय. अजून तो कसली कसली वाट बघतोय ते मी पाहणारच आहे” ‘

त्यावर अजित पवार सरळ म्हणाले निवडणूक आयोगाने चौकशी करावी

तुमच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होतोय, त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. “हा खोटा आरोप आहे. त्यांनी पैसे वाटले असतील. मी असले धंद केले नाहीत. निवडणूक आयोगाने चौकशी करावी” असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार काय म्हणाले?

‘मेरी माँ मेरे साथ हैं!” या अजित पवारांच्या डायलॉगवर त्यांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार भाजपासोबत गेल्यापासून डायलॉगबाजी करत आहेत. अजित पवारांनी 86 वर्षाच्या आईला राजकारणात ओढायला नको होतं” असं श्रीनिवास पवार म्हणाले.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....