चहा शरीराला तर चहावाला देशाला घातक, गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस : अमोल मिटकरी
उतू नका, मातू नका कारण गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस आहे," अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी (Amol mitkari on pm narendra modi) केली.
बारामती : “भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उतरती कळा लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा नेम चुकला. बारामतीत डिपॉझिट जप्त करू असं फडणवीस म्हणाले होते. मात्र नागपूरमध्ये त्यांना जिल्हा परिषद राखता आली नाही. त्यामुळे उतू नका, मातू नका कारण गर्वाचे नाव देवेंद्र फडणवीस आहे,” अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी (Amol mitkari on pm narendra modi) केली.
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्याशिवाय बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं. या भाषणापूर्वी अमोल मिटकरींनी भाषण केले. या भाषणात त्यांनी फडणवीस आणि मोदींवर जोरदार टीका केली.
“चहा हा शरीराला घातक असतो आणि चहावाला देशाला घातक असतो. अशी टोलाही मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.” फडणवीसांचा सत्तेचा माज बारामतीकरांनी उतरवला. असेही मिटकरी म्हणाले.
“मागच्या सरकारने जातीचे राजकारण केलं होतं. काठेवाडीतील लोकांनीही फडणवीसांचे ऐकलं नाही. त्यांना शपथ घालून देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित दादा कोरेगाव पार्कला आले होते. चैत्यभूमीला गेले.” असेही मिटकरी म्हणाले.
“जर बोलण्यातून लोक निवडून आले असते, तर मनसेचे 20 ते 25 लोक निवडले असते,” असेही मिटकरी (Amol mitkari on pm narendra modi) म्हणाले.